जिल्हाधिकारी जाखड शेताच्या बांधावर

जिल्हाधिकारी जाखड शेताच्या बांधावर

Published on

कासा, ता. ४ (बातमीदार) : डहाणू आणि तलासरी तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी व नागरिकांना दिलासा दिला.

डहाणू तालुक्यातील जामशेत येथे पद्माकर रामचंद्र उमतोल यांच्या तीन एकर भातपिकाचे, स्नेहल अनंत पोतदार यांच्या १२ एकर चिकू बागेचे, तसेच गुंगवाडा येथील तुलशीदास रामचंद्र बारी यांच्या भातपिकाचे नुकसान झाल्याची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. याशिवाय बाडापोखरण व गुंगवाडा येथील शेतकरी, तसेच सरावली येथील पाच नुकसानग्रस्त घरांचीही पाहणी करण्यात आली. बाबू महादू माच्छी यांच्या अडीच एकर भातपिकाच्या नुकसानीसह रडका शीतल झिरवा, विजय गणेश यादव, नितीन शेख, इस्माईल शेख, बच्चू राजक, कमलेश माच्छी, पुजा माच्छी व कलावती तांडेल या नागरिकांशी संवाद साधून जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारकडून तातडीने मदत देण्याचे आश्वासन दिले. या वेळी तहसीलदार सुनील कोळी, गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते व तालुका कृषी अधिकारी अनिल नरगुलवार उपस्थित होते.

शेतकरी, महिलांसोबत संवाद
तलासरीतील वडवली-ओझरपाडा परिसरात अतिवृष्टीमुळे वारोळी नदीला पूर आल्याने नागरिकांचे नुकसान झाले होते. अनेकांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले. जिल्हाधिकाऱ्यांनी पूरग्रस्त घरे व शेतीची पाहणी करून शेतकरी व महिलांशी संवाद साधला. आपदग्रस्तांना तातडीने सरकारी मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
या पाहणीदरम्यान तहसीलदार अमोल पाठक, गटविकास अधिकारी वैभव आफळे, तालुका कृषी अधिकारी रघू इभाड, माजी उपसभापती नंदू हाडळ, सरपंच प्रमोद ओझरे तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com