तर तलवारी, भाले काढायची काय गरज
दि. बा. पाटील यांचे नाव देण्यावर शांततेत चर्चा करावी
वनमंत्री गणेश नाईक यांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन ८ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. अशातच, या विमानतळाच्या नामकरणावरून वाद रंगला असून, विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्रांसह राजकीय नेत्यांकडून होत असून, यासाठी आंदोलनाचे इशारे देण्यात येत आहेत. त्यावर वनमंत्री गणेश नाईक यांनीही विरोधकांवर टीका केली.
ठाण्यातील मोह विद्यालयाचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून वनमंत्री गणेश नाईक उपस्थित होते, तर विशेष अतिथी म्हणून आमदार निरंजन डावखरे हे उपस्थित होते. या वेळी नाईक बोलत होते. दि. बा. पाटील यांच्या नावाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन दिवसांपूर्वी चर्चा झाली असून, येत्या शुक्रवारी (ता. ११) सह्याद्री अतिथिगृहात आगरी समाजाच्या प्रतिनिधींसोबत बैठक होणार आहे. कुठलीही गोष्ट युद्ध करता न मिळत असेल, तर त्यासाठी तलवारी आणि भाले काढायची गरज काय, अशी टीका गणेश नाईक यांनी विरोधकांवर केली.
येत्या ६ ऑक्टोबर रोजी गडकरी रंगायतन येथे जनता दरबार आयोजित केला आहे. ज्यांना शंका-कुशंका आहेत, त्यांनी या दरबारात यावे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार गोर-गरिबांवर होणारा अन्याय दूर करण्यास कटिबद्ध आहे, असा विश्वासही नाईक यांनी व्यक्त केला.
ते सगळे आता शुद्ध
गेल्या पाच वर्षांत ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकांमध्ये बहुतांश अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आहे. ते सगळे आता शुद्ध व्हायला लागले असल्याची प्रतिक्रिया नाईक यांनी दिली. पालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाच प्रकरणात अटक झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवरदेखील त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.