गच्चीवर आढळला मांजऱ्या जातीचा दुर्मिळ साप
गच्चीवर आढळला मांजऱ्या जातीचा दुर्मिळ साप
नेरूळ, ता.४ (बातमीदार)ः काळा आणि राखाडी रंग पांढरे चट्टे असलेला दुर्मिळ प्रजातीचा मांजऱ्या साप नवी मुंबई मधील सीबीडी सेक्टर ८ सुनिता थोरात यांच्या घराच्या छतावर चार फूट लांबी असलेला आढळला होता. पुनर्वसू फाउंडेशनचे संस्थापक प्रीतम दिलीप भुसाने यांनी त्याला पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडून दिले.
दुर्मिळ प्रजातीचा मांजऱ्या साप यापूर्वी मागील १८ वर्षात फक्त दोनदा या भागात आढळला होता. मांजऱ्या साप निमविषारी असल्याचे सर्पमित्र प्रीतम यांनी सांगितले. मांजरा सापाचे डोके गोल कडा असलेले त्रिकोणी आकाराचे असून डोळ्याच्या बाहुल्या मांजराप्रमाणे तसेच उभ्या रचनेत असतात. याशिवाय या सापाच्या अंगावर मांजराच्या त्वचे सरकार रंग आणि चट्टे असल्याने हा मांजरा साप किंवा कॅट स्नेक म्हणून ओळखला जातो. या मांजऱ्या सापामध्ये लालसर तपकिरी रंग आणि दुसरा करडा रंग असे दोन रंग आढळून येतात.