मुंबई
एमएच४३-सीआर मालिकेची नोंदणी सुरू
एमएच४३ -सीआर मालिकेची नोंदणी सुरू
वाशी ता.४ (बातमीदार) ः नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन कार्यालय तर्फे एमएच ४३ -सीआर या नवीन वाहन क्रमांक मालिकेची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ७ ऑक्टोबर २०२५ पासून या मालिकेअंतर्गत नवीन वाहनांची नोंदणी सुरू होणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांनी दिली. या अनुषंगाने शुक्रवार (ता.३) व सोमवार (ता.६) सकाळी ११ ते २.३० या वेळेत क्रमांक आरक्षणासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तसेच एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास लॉटरी प्रणालीद्वारे निर्णय घेतला जाईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांनी सांगितले.