शिक्षण प्रसारक विद्यालयात गांधी जयंती साजरी

शिक्षण प्रसारक विद्यालयात गांधी जयंती साजरी

Published on

शिक्षण प्रसारक विद्यालयात गांधी जयंती साजरी
नेरूळ, ता.४ (बातमीदार)ः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती संस्थेचे अध्यक्ष नामदेव रामा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्षांनी मार्गदर्शन करत असताना म्हणाले की, महात्मा गांधींनी भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला सत्य, अहिंसा मार्ग दाखवला. कोणत्याही प्रकारचे शस्त्र न वापरता अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र मिळवता येते हा प्रयोग आपल्या राष्ट्रपित्याने आपल्या देशात करून दाखवला आहे. सत्याचा मार्ग हा यशाचा मार्ग असतो स्व विकास साठी प्रत्येकाने सत्याचा मार्गच अवलंबिला पाहिजे हा आदर्श महात्मा गांधी यांनी आपल्याला कृतीतून घालून दिलेला आहे प्रत्येकाने त्याच मार्गाने आपले मार्गक्रमण करावे त्यातून प्राप्त झालेले यश हे टिकाऊ स्वरूपाचे असते हे सिद्ध झालेले आहे आपल्या शेजारील देश सुद्धा आपल्या सोबत स्वातंत्र्य झाला परंतु आज आपण पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहोत स्वावलंबन हाच आपला मूळ पाया आहे म्हणून प्रत्येकाने गांधीजींच्या मार्गाचा अवलंब करून इतरांपुढे आदर्श ठेवावा अशा प्रकारे आपले मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका सौ प्राजक्ता कोठेकर मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

Marathi News Esakal
www.esakal.com