ढ विद्यार्थ्याने शाळा सोडली तर....
ढ विद्यार्थ्याने शाळा सोडली तर....
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या बॅनरची चर्चा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : एका ढ विद्यार्थ्याने शाळा सोडली तर नुकसान त्याचे होते. विद्यापीठाचे नाही, असा संदेश देणारे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार पक्षाने चंदनवाडी परिसरात लावले आहेत. या बॅनरमधून पक्ष सोडणाऱ्यांना फटकारले आहे. या बॅनरची चांगलीच चर्चा परिसरात सुरू आहे.
दोन दिवसांपूर्वी सुहास देसाई यांनी शरद पवार पक्ष सोडला. त्यांचे नाव न घेता, असंघटित सेलचे अध्यक्ष राजू चापले यांनी बॅनरद्वारे त्यांना फटकारले आहे. चापले यांनी, चंदनवाडी, गणेशवाडी परिसरात हे बॅनर लावले असून बॅनरवर, पोरं शाळा सोडून गेली तर शाळा बंद पडत नाही. पुन्हा नव्याने विद्यार्थी घडविण्याचे काम शाळा मास्तर करतो. आमचा मात्र लय खमक्या आहे आणि डाॅ.जितेंद्र आव्हाड हे विद्यापीठ आहे; ते कार्यकर्ते घडवतात! एका ढ विद्यार्थ्याने शाळा सोडल्याने नुकसान त्याचे होते, विद्यापीठाचे नाही, असे संदेश लिहीत राजू चापले यांनी टका केली.