रक्तदानात ठाणे तिसऱ्या क्रमांकावर

रक्तदानात ठाणे तिसऱ्या क्रमांकावर

Published on

रक्तदानात ठाणे तिसऱ्या क्रमांकावर
पाच हजार २११ जणांचे रक्तदान
ठाणे शहर, ता. ४ (बातमीदार) ः दान केलेल्या रक्ताची एक बाटली अनेकांचा जीव वाचवते. हे कर्तव्य समजून पाच हजार २११ रक्तदात्यांनी अनेकांचे जीव वाचवण्याचे काम केले. स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत १३० शिबिरांमधून हे रक्तदान करण्यात आले. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. या कालावधीत रक्त संकलन करण्यात ठाणे आरोग्य विभागाचा महाराष्ट्रात तिसरा क्रमांक लागला.
सरकारच्या वतीने ठाणे जिल्ह्यात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबविले. आरोग्य विभागाकडून महिलांच्या आरोग्याच्या तपासण्या रक्तदाब, डायबिटीस, कॅन्सर, हिमोग्लोबिन, क्षयरोग यांसह इतर चाचण्या मोठ्या प्रमाणात पार पडल्या. या दरम्यान रक्तदान शिबिरालादेखील चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे, रक्तपेढी प्रमुख डॉ. गिरीश चौधरी, डॉ. राजू काळे, मेट्रन प्रतीभा बर्डे, अधिपरिचारिका विजया पवळे यांच्या उपस्थितीत सिव्हिल रुग्णालयाचे डॉ. महेंद्र केंद्रे यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.

जिल्हा रुग्णालयाचे लवकरच सुपरस्पेशालिटीत रूपांतर
जिल्हा रुग्णालयाचे लवकरच सुपरस्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर होणार आहे. त्यामुळे रुग्णांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात रक्त लागणार आहे. यासोबतच प्रसूती अथवा सिझर करतानादेखील रक्ताची गरज भासत असते. या सर्व पार्श्वभूमीवर रक्तदानाचे महत्त्व आणखी अधोरेखित होते. ठाणेकरांनी दाखवलेली सजगता व सामाजिक बांधिलकी ही खरंच कौतुकास्पद असल्याचे डॉक्टरांकडून सांगितले.


डेंग्यू-चिकनगुनियासारख्या डासजन्य आजारांमध्ये रक्ताची गरज वाढते. जिल्हा रुग्णालयात गरीब गरजू रुग्ण उपचारासाठी येत असल्यामुळे त्यांना बाहेरून रक्त आणणे परवडत नाही. अशावेळी सरकारी रुग्णालयांमध्ये रक्तदात्यांनी दान केलेले रक्त फार मौल्यवान ठरते. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक नागरिकाने रक्तदान केले पाहिजे.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com