नवरात्र उत्सव
नवरात्रोत्सव म्हणजे स्त्रीशक्तीचा उत्सव. स्त्री शक्तीचे, आदिशक्तीचे विविध रूपांच्या पूजनासह चैतन्याचा उत्सव. त्यामुळे नऊ दिवस सकारात्मक ऊर्जा नवचैतन्य संचारलेले होते. गेले नऊ दिवस अनेक महिलांच्या ग्रुपने, बचत गटांनी विविध संघटनांनी या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद. श्री दीपक साडीज पनवेल यांच्या सहकार्याने हा उत्सव आपण नवरात्र नवरंग स्पर्धेच्या निमित्ताने साजरा केलेला आहे. आज या स्पर्धेची सांगता होत आहे. ‘सकाळ’कडे पाठवलेल्या काही निवडक फोटोंमधून आज बंपर बक्षिसासाठी विशेष मानकरी निवडण्यात येणार आहेत. या नवरात्रामध्ये ज्या महिलेच्या डोक्यावर मुकुट ठेवण्यात आलेला होता, त्या सर्व महिलांना लवकरच समारंभपूर्वक पैठणी प्रदान करण्यात येणार आहे. समारंभाची तारीख, वेळ व ठिकाण विजेत्यांना लवकरच कळविण्यात येईल. आतापर्यंत निवडलेल्या विजेत्या महिलांनी कृपया अधिक तपशिलासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
संपर्क ः ८८८८८४९२२३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.