चित्रकारांना ‘एआय’मुळे चिंता?

चित्रकारांना ‘एआय’मुळे चिंता?

Published on

चित्रकारांना ‘एआय’मुळे चिंता?
सर्जनशीलतेला पर्याय नसल्याचे काहींचे मत

मयूर फडके ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः साहित्य, संगीत व चित्रकला यांसारख्या कला क्षेत्रांमध्ये मानवी भावना, अनुभव आणि सर्जनशीलतेला महत्त्वाचा वाटा असतो; पण २१व्या शतकात एआय आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर खूप वेगाने वाढत आहे. या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेक चित्रकारांवर संकट घोंघावत असल्याची भीती काही अनुभवी चित्रकारांनी व्यक्त केला आहे. काहींनी मात्र एआय सर्जनशीलतेला पर्याय ठरूच शकत नसल्याचे ठाम मत मांडले.
मुंबईतील काळा घोडा परिसरातील जहांगीर आर्ट गॅलरीसमोर अनेक चित्रकार काम करतात. यातील एक चित्रकार गणराज चौधरी हे  गेल्या  दोन दशकांपासून या ठिकाणी  स्केच, पोट्रेट, कॅनव्हास अशी विविध प्रकारची पेंटिंग करतात. दर्दी रसिकांमुळे आपल्या कलेला मरण नाही याची त्यांना खात्री आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून एआयच्या वाढत्या प्रभावाचा परिणाम त्यांना  जाणवू लागला आहे. भविष्यात हे संकट अधिक गहिरे होईल, अशी भीती चौधरी यांना वाटते. अनेक कलावंतांना मात्र एआयची भीती वाटत नाही. दुसरीकडे  डिजिटल पेंटिंग अथवा एआयमुळे आमच्या व्यवसायावर  अद्याप परिणाम झाला नाही; मात्र असे असले तरी भविष्यात त्याचे संकट नक्कीच असणार आहे. कलेची पारख नसणारे रसिक असले तर त्यांची फसवणूक होऊ शकते. डिजिटल पेंटिंगमुळे यापूर्वीच अनेकांची फसणूक झाली असल्याचे चित्रकार प्रसाद भंडारी यांनी सांगितले. ‘एआयसोबतच वाढत्या डिजिटल पेंटिगच्या पर्यायामुळे पेटिंग काहीशे रुपयांत उपलब्ध होत आहेत. त्यामुळे या बनावट चित्रकारांचे फावले आहे,’ असे चित्रकार गणराज चौधरी यांनी सांगितले.
...
कॉपी बहाद्दर आर्टिस्टचा सुळसुळाट
जहांगीर आर्ट गॅलरीबाहेरील परिसरात मागील तीन ते चार दशकांपासून डझनभर चित्रकार व्यवसाय करतात. काही वर्षांपासून त्यांना खोट्या, कॉपी बहाद्दर चित्रकारांमुळे फटका बसत असल्याची तक्रार काही चित्रकारांनी ‘सकाळ’कडे केली. चित्र कॉपी करणे, डिजिटल प्रिंट मारून पेंटिंग करून देणे, डिजिटल कॅनव्हासवर चित्र प्रिंट करून ते खरे असल्याचे भासवणे असे अनेक गैरव्यवहार या ठिकाणी सर्रास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. किंबहुना अलीकडे अशा चित्रकारांची दादागिरी वाढली आहे. स्थानिक पुढाऱ्यांचे पाठबळ असल्यामुळे ते आता मनमानी करीत असल्याची तक्रारही चित्रकारांनी केली. आम्ही रस्त्यावर काम करीत असल्यामुळे आमच्यावर  काही नियमांची बंधने आहेत; मात्र खोट्या चित्रकारांना ती लागू होत नाहीत याचा त्रास आम्हाला होतो, असेही त्यांनी सांगितले.
...
आपण तंत्रज्ञानाला थोपवू शकत नाही. त्याकडे आपण सकारात्मकेने पाहावे. त्याचा वापर  कसा करता येईल याचा विचार करावा. मुळात आपल्याला काय हवे ते एआय देईल याची ग्वाही देता येत नाही. त्यामुळे अमूर्त चित्रकलेला मानवी मेंदूशिवाय पर्याय नाही. 
- प्रा. विजय राऊत, ज्येष्ठ चित्रकार
...
एआयमुळे चित्रकार आणि त्यांच्या कलेवर कुठलाही परिणाम होणार नाही. याआधी फोटोशॉप आले तेव्हाही असेच बोलले जात होते. उलट पेंटिंगची जाण असणाऱ्यांना खऱ्या आणि खोट्यातील फरक लगेच दिसून येतो.
- प्रफुल्ल तायवडे, ज्येष्ठ चित्रकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com