ऐरोलीत बेकायदा पार्किंगचा बसथांब्याला विळखा

ऐरोलीत बेकायदा पार्किंगचा बसथांब्याला विळखा

Published on

ऐरोलीत बेकायदा पार्किंगचा बसथांब्याला विळखा
ऊन-पावसात उभे राहून बसची प्रतीक्षा; ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांचे हाल
वाशी, ता. ५ (बातमीदार) : ठाणे–बेलापूर मार्गावरील ऐरोली नाका येथे नवी मुंबई महापालिका परिवहन (एनएमएमटी) सेवेचा अधिकृत बस थांबा असूनही, सध्या तो गॅरेज व्यावसायिक आणि रिक्षा चालकांच्या ताब्यात गेल्याचे चित्र आहे. थांब्याच्या पाठीमागे अनधिकृत गॅरेज, वेल्डिंग शॉप्स आणि विनापरवाना वाहन पार्किंगमुळे बसस्टॉपचा परिसर अक्षरशः ‘गिळंकृत’ झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावर उन्हात आणि पावसात उभे राहून बसची वाट पाहावी लागत असल्याने नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे.
संबंधित परिसर ठाणे–बेलापूर मार्गावरील सर्वाधिक गर्दीचा आणि वाहतुकीचा असलेला भाग म्हणून ओळखला जातो. ऐरोली नाका, यादवनगर, चिंचपाडा, समता नगर, ऐरोली गाव, महावितरण कॉलनी अशा परिसरातील नागरिक तसेच चाकरमानी, शालेय विद्यार्थी दररोज पनवेल, वाशी आणि बेलापूरच्या दिशेने या थांब्यावरून प्रवास करतात. सकाळी आणि संध्याकाळी या थांब्यावर प्रचंड गर्दी असते. मात्र काही महिन्यांपासून गॅरेजवाल्यांनी बसथांब्याच्या मागील जागा व्यापून दुकाने थाटल्याने परिस्थिती बिकट बनली आहे. रिक्षा दुरुस्तीसाठी आलेली वाहने दिवसभर पदपथालगत उभी असतात. काही बाहेरील रिक्षा आणि खासगी वाहनेही थांब्याच्या अगदी जवळ पार्क केली जातात. त्यामुळे प्रवाशांना बस पकडण्यासाठी रस्त्याच्या मधोमध उभे राहावे लागते, जे धोकादायक ठरत आहे. विशेषतः महिलांना आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक रहिवाशांनी या परिस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत एनएमएमटी बस थांबा हा प्रवाशांसाठी आहे की गॅरेजवाल्यांसाठी?, असा सवाल उपस्थित केला आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी वाढत आहे.
...............
वाहनांवर होणार कारवाई
या प्रकरणी ऐरोली विभाग अधिकारी सुनील काटोळे यांनी सांगितले की, नवी मुंबई महापालिकेच्या वतीने परिसराची पाहणी करण्यात येणार आहे. विनापरवाना व्यवसाय व मनमानी वाहन पार्किंगवर कठोर कारवाई केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com