बनावट जीएसटी नोंदणीद्वारे १.८५ कोटींची फसवणूक!
बनावट जीएसटी नोंदणीद्वारे १.८५ कोटींची फसवणूक!
उल्हासनगरात स्प्लॅश ट्रेडर्सचा महाघोटाळा उघड
उल्हासनगर, ता. ५ (वार्ताहर) : उल्हासनगर शहरात मे. स्प्लॅश ट्रेडर्स नावाच्या फर्मने खोट्या कागदपत्रांवर बनावट जीएसटी नोंदणी मिळवून शासनाची तब्बल एक कोटी ८५ लाख ८८ हजार ८५१ रुपयांची फसवणूक केल्याचा मोठा घोटाळा राज्य कर विभागाने उघडकीस आणला आहे. या प्रकरणात ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने सखोल तपास सुरू केला असून, व्यापारी नरेश याकुब आठवले आणि इतर अज्ञात व्यक्तींची नावे समोर आली आहेत.
व्यापाऱ्यांनी बनावट दस्तऐवज, खोटे ई-मेल आयडी आणि स्वतःचे नसलेले पत्ते वापरून जीएसटी नोंदणी मिळवली. यानंतर बनावट बिलांचा व खोट्या व्यवहारांचा आधार घेत त्यांनी शासनाकडून १.८५ कोटी रुपयांचा जीएसटी परतावा बँक खात्यात जमा करून घेतला. राज्य कर विभागाच्या अन्वेषण शाखेने चौकशी केली असता, नोंदणीच्या पत्त्यावर कोणताही व्यवसाय सुरू नसल्याचे आढळले. चौकशीदरम्यान नरेश आठवले नावाच्या व्यक्तीच्या कागदपत्रांचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्याने आपला या व्यवसायाशी कोणताही संबंध नसल्याचे शपथपत्र दिले आहे. त्यामुळे इतर अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या नावाचा व कागदपत्रांचा गैरवापर केल्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.
तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे
सहाय्यक राज्य कर आयुक्त ईश्वरचंद्र पवार यांच्या तक्रारीवरून राज्य कर निरीक्षक अनिल चव्हाण यांनी तपास करून सर्व पुरावे ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवले आहेत. आर्थिक गुन्हे शाखा या फसवणुकीतील अज्ञात सहआरोपींचा शोध घेत असून, बँक व ई-मेल ट्रेलच्या आधारे डिजिटल पुरावे गोळा करत आहे. या महाघोटळ्यामुळे जीएसटी नोंदणी प्रक्रियेतील पडताळणीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.