उल्हासनगरात दिवाळीमध्ये खरेदीचा गजबजाट वाढणार

उल्हासनगरात दिवाळीमध्ये खरेदीचा गजबजाट वाढणार

Published on

उल्हासनगर, ता. ५ (बातमीदार) : राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार आता मद्यविक्रीची ठिकाणे वगळता बाजारपेठा, हॉटेल, मॉल आणि चित्रपटगृहे २४ तास खुले ठेवता येणार आहेत. या निर्णयाने व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उल्हासनगर शॉपकिपर असोसिएशनचे अध्यक्ष दीपक छतलानी यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करताना दिवाळीसह सणासुदीच्या काळात खरेदीचा गजबजाट वाढेल, असा विश्वास व्यक्त केला.
सरकारच्या १ ऑक्टोबरच्या परिपत्रकानुसार दारूची दुकाने, बार, परमिट रूम, हुक्का पार्लर आणि कंट्री बार पूर्वीप्रमाणेच वेळेनंतर बंद ठेवावी लागतील. तर बाजारपेठा, मॉल, हॉटेल आणि चित्रपटगृहे २४ तास सुरू राहतील. विशेषतः सण, लग्नसमारंभ, साखरपुडा यांसारख्या प्रसंगी व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना रात्रीच्या सुमारास माल उतरवणे आणि भरणे सुलभ होणार आहे. पूर्वी पोलिसांचा त्रास होत होता; मात्र आता पोलिसच व्यापाऱ्यांचे सुरक्षा कवच ठरणार आहेत. तसेच कामगारांची शिफ्ट दहा तासांनंतर बदलली जाणार असून, त्यांना साप्ताहिक सुट्टी देण्यात येईल. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. उल्हासनगर शॉपकिपर असोसिएशनअंतर्गत सुमारे ३० व्यापारी संघटना आहेत. या सर्व संघटनांना सरकारचे परिपत्रक देऊन निर्णयाबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचे छतलानी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com