जानेवारी ते ऑगस्ट पर्यंत नवी मुंबईत १२७० अनधिकृत बांधकामांना नोटीस

जानेवारी ते ऑगस्ट पर्यंत नवी मुंबईत १२७० अनधिकृत बांधकामांना नोटीस

Published on

जानेवारी ते ऑगस्ट पर्यंत नवी मुंबईत १२७० अनधिकृत बांधकामांना नोटीस
तुर्भे, ता. ५ (बातमीदार) – नवी मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामांविरुद्ध ठोस कारवाई सुरू ठेवली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना कायदा, १९६६ अंतर्गत नोटीस बजावण्यात येतात; मात्र मालकांनी नोटीस न पाळल्यास जेसीबी, गॅस कटर यांसारखी साधने वापरून बांधकामं तोडण्याबरोबरच दंडही आकारला जातो.
प्रशासनाने जानेवारी ते ऑगस्ट २०२५ दरम्यान एकूण १२७० अनधिकृत बांधकामांना नोटीस बजावल्या असून, ६७ बांधकामांवर तोडफोड केली आहे. ९४ प्रकरणांत गुन्हे नोंदवले गेले असून, तब्बल ३० लाख ३२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, असे अतिक्रमण उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांनी सांगितले.
अनधिकृत बांधकामांवर कारवाई अनेक विभागांत सुरू आहे. कोपरखैरणे विभागात सर्वाधिक ४९१ नोटीस बजावल्या गेल्या, तर तुर्भे विभागात २७१, नेरुळ विभागात १५९ आणि ऐरोलीत १९४ नोटीस दिल्या गेल्या. ऐरोलीत ७५, कोपरखैरणे ५१, तुर्भे २६, नेरुळ ४५ व बेलापूर ३८ बांधकामांवर थेट कारवाई करण्यात आली. बेलापूर विभागात सर्वाधिक २७ गुन्हे नोंदवले गेले आहेत.
कारवाईत अवैध इमारती, होटेल्स, बार, हुक्का पार्लर, तसेच फेरीवाले यांच्यावरही पावले उचलली गेली. मनपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे व अतिक्रमण उप-आयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम प्रत्येक विभागात राबवण्यात येत आहे.
मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शहरी नियोजनाचे नियम टिकवण्यासाठी व अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी ही कारवाई भविष्यातही सातत्याने सुरू राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com