कॅन्सरग्रस्त रुग्णांनी लुटला संगीतमय संगीत आनंद
कॅन्सरग्रस्त रुग्णांनी लुटला संगीताचा आनंद
खारघर (बातमीदार) : देशातील विविध राज्याती कर्करोग रुग्ण हे खारघर येथील टाटा रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी येतात. खोली भाड्याने घेवून वास्तव्य करणे शक्य नसल्यामुळे हे रुग्ण खारघर येथील मंगलम चॅरिटेबल फाउंडेशन आश्रमात राहतात. सद्यस्थितीत आश्रमात २८ रुग्ण आणि २८ केअर टेकर, आश्रमात सेवा देणारे सामाजिक कार्यकर्ते, संस्थेचे पदाधिकारी वास्तव्य करीत आहे. उपचार घेत असलेल्या कर्करोग रुग्णांस संगीतमय कार्यक्रमाचा आनंद घेता यावा यासाठी रविवारी (ता. ५) टाटा हॉस्पिटलमध्ये संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई घाटकोपर येथील प्रतिभावान कलाकारांनी विविध गाणी, नृत्य, कॉमेडी सादर करून कॅन्सरग्रस्त रुग्णांची मन जिंकली. यावेळी टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे वरिष्ठ कर्करोगतज्ज्ञ डॉ. अमित जोशी यांनी मंगलम आश्रमाला भेट देवून रुग्णांशी संवाद साधला. यावेळी ट्रस्टचे व्यवस्थापक सोम्या गुप्ता आणि इतर सदस्य उपस्थित होते.