दि. सेंट्रल रेल्वे तिकीट तपासणी स्टाफ वेल्फरट्रस्टकडून पूरग्रस्तांना १.७१ लाखांची भरीव मदत
पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात
नवी मुंबई, ता. ६ (वार्ताहर) : दि सेंट्रल रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ वेल्फेयर ट्रस्टने महाराष्ट्र, पंजाब आणि उत्तराखंड येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या कर्मचाऱ्यांकडून एक लाख ७१ हजार रुपये इतकी रक्कम मदतीसाठी देण्यात आली आहे.
ओकार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली, या रकमेचा धनादेश शनिवारी (ता. ४) पंजाबमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सुपूर्द करण्यात आला. हा धनादेश गुरू सिंग सभा (दादर गुरुद्वारा)चे अध्यक्ष कुलदीप सिंग आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडे देण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष डी. व्ही. चिंदरकर, सचिव हरिश मोंडकर, खजिनदार गिरीश कदम, उपाध्यक्ष अभय कांबळे, ट्रस्टी आर. एम. बिरवटकर आणि सभासद आमरिक सिंग कपूर उपस्थित होते. महाराष्ट्र आणि उत्तराखंड या राज्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत ट्रस्टने जाहीर केली आहे. या सहकार्याबद्दल ट्रस्टचे सेक्रेटरी हरिश मोंडकर यांनी आभार मानले आहेत.