नर्मदा राजपूतला रयत पुरस्काराने सन्मान
नर्मदा राजपूतला रयत पुरस्काराने सन्मान
विरार ता.६ (बातमीदार) : सातारा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी रायगड विभागातील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींना तुकाराम हरी वाजेकर यांच्या नावे दिला जाणारा प्रतिष्ठेचा “रयत आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार” यावर्षी जूचंद्र ची विद्यार्थिनी कु. नर्मदा राजपूत (इयत्ता नववी अ) हिला प्रदान करण्यात आला आहे. या निवडीमुळे शाळेचा तसेच स्थानिक समाजाचा अभिमान उंचावला आहे.
कु. नर्मदा राजपूत ही परिश्रमी, कर्तव्यदक्ष आणि आदर्श विद्यार्थिनी म्हणून ओळखली जाते. तिने शैक्षणिक क्षेत्रात सातत्यपूर्ण प्रगती करताना विविध स्पर्धा परीक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शालेय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. तिच्या प्रामाणिक वर्तनामुळे, नेतृत्वगुणांमुळे आणि शिक्षकांप्रती आदरभावामुळे ती सर्वांची आदर्श लाडकी विद्यार्थिनी ठरली आहे. संस्थेच्या १०६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पुरस्कार वितरण सोहळा कर्मवीर समाधी परिसर, सातारा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.