बदलापूर शहरात पांघरली धुक्यांची चादर

बदलापूर शहरात पांघरली धुक्यांची चादर

Published on

बदलापूर शहरात पसरली धुक्यांची चादर
बदलापूर, ता. ६ (बातमीदार) : पाऊस कमी झाल्यानंतर थंडीची चाहूल जाणवायला लागली असून, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बदलापूर शहरात पहाटे मोठ्या प्रमाणावर धुकं पसरले होते. जणू पावसानंतर बदलापूर शहरावर धुक्याची चादर अंगावर पांघरली होती. शहरातील रेल्वे स्थानक, राज्य महामार्ग, तसेच इतर भाग सगळीकडेच धुक्यात हरवलेले दिसत होते. पावसाच्या विश्रांतीनंतर बदलापुरात सोमवारी (ता.६) पहाटेपासूनच थंडीची चाहूल जाणवली. आठवड्याचा पहिला दिवस असताना वातावरणात गारवा आणि धुके एकत्र पसरले होते. धुक्यात संपूर्ण शहर धुक्याच्या कुशीत हरवलेले होते. सकाळी सात वाजेपर्यंत धुके कायम होते. शहरातील मोठमोठ्या इमारती धुक्यात अस्पष्ट दिसत होत्या. रेल्वे रुळांवरही घनदाट धुकं पसरलेले होते. सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसाच्या मुसळधार पावसानंतर आता हिवाळ्याची चाहूल लागल्याने बदलापूरकरांसाठी हा थंडावा सुखदायक ठरला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com