ठाणेकरांसाठी तीन दिवस पाणीबाणीचे

ठाणेकरांसाठी तीन दिवस पाणीबाणीचे

Published on

ठाणेकरांसाठी तीन दिवस पाणीबाणीचे
१० टक्के पाणीकपात लागू
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : शरद पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून ठाणेकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. मुंबई महापालिकेच्या पिसे व पांजरापूर येथील विद्युत केंद्रात वीज मीटर्स अद्ययावत करण्याचे काम सुरू असून, ७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान ठाणे शहरात १० टक्के पाणीकपात लागू केली जाणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या पाण्याचा पुरवठा होणाऱ्या ठाणे शहरातील काही भागांना टंचाईची झळ बसणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील सुमारे २७ लाख नागरिकांना ५९० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो. यापैकी २५० दशलक्ष लिटर पाणी पालिकेच्या स्वत:च्या योजनेतून, १३४ दशलक्ष लिटर पाणी एमआयडीसीकडून, ११५ दशलक्ष लिटर स्टेमकडून आणि ८६ दशलक्ष लिटर पाणी मुंबई महापालिकेकडून पुरवठा केला जातो. मुंबई महापालिकेचा पुरवठा जुने ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात केंद्रित आहे. गेल्या आठवड्यातील मुसळधार पावसामुळे पिसे पम्पिंग स्टेशनमध्ये गाळ आणि कचरा अडकल्यामुळे पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला होता. त्यातून दिलासा मिळालेला नाही, तर आता पुन्हा ठाणेकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. ७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान १० टक्के कपात होणार असून, या काळात नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून त्याची काटकसर करून वापर करावा, असे महापालिकेने आवाहन केले आहे.

टंचाईचा सामना
नौपाडा, पाचपाखाडी, हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथनगर, नामदेववाडी, साईनाथनगर, रामचंद्रनगर १, किसननगर नं. १, किसननगर नं. २, शिवाजीनगर, पडवळनगर, जनता झोपडपट्टी, शिवशक्तीनगर, करवालोनगर, अंबिकानगर, ज्ञानेश्वरनगर, जय भवानीनगर, काजूवाडी, जिजामातानगर, बाळकूम पाडा नं. १, लक्ष्मीनगर, डॉ. आंबेडकरनगर, मानपाडा (नळपाडा), कोपरी धोबीघाट, गावदेवी (लुईसवाडी) जलकुंभ, टेकडी बंगला जलकुंभ, भटवाडी, इंदिरानगर, आनंदनगर, गांधीनगर, कोपरी कन्हैयानगर इत्यादी. महापालिका प्रशासनाने नागरिकांना विनंती केली आहे, की पाणीकपातीच्या काळात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी वापरू नये आणि पाण्याचा बचाव करण्यासाठी सहकार्य करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com