काही भागात दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा
काही भागात दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा
ठाणे महापालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती आणि लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर संप येथे केंद्र सरकारच्या अमृत २.० पॅकेज २ अंतर्गत नवीन पाणी साठवण टाकी (संप) आणि जलकुंभ उभारण्याचे काम सुरू आहे. या कामाच्या अनुषंगाने जुन्या संपचे तोडकाम करावे लागणार असून त्यासाठी पंपाचे पॅनल शिफ्टिंग करणे आवश्यक आहे. या कामासाठी मंगळवारी (ता. ७ ) सकाळी नऊ ते बुधवारी (ता. ८) सकाळी नऊ वाजेपर्यंत एकूण २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या शटडाऊन कालावधीत खालील जलकुंभ आणि संबंधित परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित होणार आहे.
इंदिरानगर जलकुंभ, श्रीनगर जलकुंभ, वारलीपाडा जलकुंभ,कैलासनगर रेनो टँक, रूपादेवी जलकुंभ, रूपादेवी रेनो टँक, रामनगर जलकुंभ, येऊर एअर फोर्स जलकुंभ, लोकमान्य जलकुंभ हे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल. मात्र, सुरुवातीचे एक ते दोन दिवस पाणी कमी दाबाने येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.