वन्यजीव संवर्धनाचा संदेश
वन्यजीव संवर्धनाचा संदेश
वॉर फाउंडेशनतर्फे वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा
कल्याण, ता. ८ (बातमीदार) : वॉर फाउंडेशनने वन विभागाच्या सहकार्याने १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह विविध उपक्रमांद्वारे साजरा केला. आठवडाभर चाललेल्या या कार्यक्रमात वन्यजीव संवर्धन, निसर्गासोबत सहअस्तित्व आणि पर्यावरणीय शाश्वततेचा संदेश पोहोचवण्यात आला. या विशेष उपक्रमात पंधराहून अधिक शाळांमध्ये जागरूकता व्याख्याने आयोजित केली ज्यातून हजारहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत वन्यजीव संरक्षणाचा संदेश पोहोचला.
विद्यार्थ्यांमध्ये सापांची ओळख, सर्पदंश प्रतिबंध, सर्पदंशग्रस्तांना प्रथमोपचार, वन्यजीवांबद्दलचे गैरसमज दूर करणे, स्थानिक वनस्पतींचे महत्त्व तसेच अवैध वन्यजीव व्यापार प्रतिबंध यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन केले. याशिवाय हिरवळ वाढवण्यासाठी वृक्षारोपण अभियान आणि विद्यार्थ्यांसह शिक्षक व नागरिकांचा सक्रिय सहभाग असलेली जागरूकता रॅलीही आयोजित करण्यात आली. या रॅलीत नैसर्गिक अधिवासांचे संवर्धन, वन्यजीवांचे रक्षण आणि पर्यावरणीय संतुलनाचा संदेश देण्यात आला.वॉर फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कांबळे यांनी सांगितले, “वन्यजीव संवर्धन हे आपल्या ग्रहाच्या पर्यावरणीय संतुलनासाठी अत्यावश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे तरुण पिढीत निसर्गाबद्दल जबाबदारीची आणि करुणेची भावना निर्माण होते. या कार्यक्रमाला साथ देणाऱ्या वन विभागाचे आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.”
कार्यक्रमात वन परिक्षेत्र अधिकारी नीलेश आखाडे, वनपाल आर. डी. शिंदे, विलास सानप, मुरलीधर जागकर, सचिन तळपाडे तसेच वनरक्षक एम. वी. सावंत, संजय साबळे, रोहित भोई, मस्ताराम पावरा, किशोर राजपूत, रेखा गायकवाड, सुशांत निकम, मोहिनी शेळके, संजय हांडे, संजीव शिंदे, गणेश सुफे, मंजु गायकवाड, अंगद केंद्रे आणि वॉर फाउंडेशनचे स्वयंसेवक प्रेम आहेर, पार्थ पठारे, तन्मय माने, रोमा त्रिपाठी, साक्षी दहिवळकर, मनीष पिंपळे, लितेश शेजवळ, रोमेश यादव, शौर्य बोबडे, सागर म्हात्रे, ईशान जाधव, सम्यक पिंपळीसकर आणि शुभम पिंपळकर उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांपासून स्थानिक नागरिकांपर्यंत सर्वांच्या मनात वन्यजीव आणि निसर्ग संवर्धनाची जाणीव वृद्धिंगत झाली. सहभागींच्या शपथेद्वारे वन्यजीव संरक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन आणि निसर्गासोबत सहअस्तित्वाचा निर्धार केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.