बनवाबनवी करत नाही म्हणून मतदार आकर्षित
बनवाबनवी करीत नाही म्हणून मतदार आकर्षित
शिवसेना पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी भरत गोगावले यांचा दावा
रोहा, ता. ८ (बातमीदार) : आम्ही वायफळ बडबड न करता विकासकामांच्या माध्यमातून त्यांना उत्तर देत नम्रपणे काम करीत आहोत. वेळप्रसंगी सर्वांच्या मदतीला धावून जातो. गोरगरिबांना नेहमी सहकार्य करतो, असे सांगत बनवाबनवी आमच्या रक्तात नाही म्हणून कोणाला फसवत नाही. आम्हाला खोटे आणि चुकीचे बोलायची सवय नाही. म्हणून मतदार आपल्याकडे आकर्षित होत आहेत, अशा शब्दांत भरत गोगावले यांनी खासदार तटकरेंवर हल्ला चढवला.
कोलाड विभागातील पुगांव येथे शिवसेनेच्या वतीने (शिंदे गटाच्या) आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी मंत्री गोगवले यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत खासदार सुनील तटकरे यांचा खरपूस समाचार घेतला. या वेळी मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी व तालुका प्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर खुश होऊन आंबेवाडी जि. प. मतदारसंघाचे माजी सदस्य व आदिवासी समाजातील उमदे नेतृत्व दया पवार, रोठ सरपंच गीता मोरे, जनार्दन मोरे यांच्यासहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जबर फटका बसला आहे. या वेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, तालुका प्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे, उपतालुका प्रमुख चंद्रकांत जाधव, महिला संघटक अमृता धनावडे, ग्राहक संरक्षण कक्षाचे विजय बोरकर, युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, उदय खामकर, मंगेश रावकर, प्रकाश कोळी, नीलेश वारंगे, योगेश खामकर, संजय मोरे, अजय बाकडे आदी मान्यवर उपस्थित होते. मनोगत व्यक्त करताना गोगावले म्हणाले, की मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात महापुरामुळे लोकांचे अतोनात नुकसान झाले. काही उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शासनाची नियमाप्रमाणे मदत मिळेल, पण प्रत्यक्ष जागेवर ५० हजार रुपये मदत देण्याचे काम या सरकारने केले आहे. शिवसेना कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा काम करते. संघटना ही कार्यकर्त्यांच्या जीवावर उभी राहते, असे मंत्री भरत गोगावले म्हणाले.
....................
१ जूनपासून रोह्यातील विविध विभागांतून शिवसेनेत पक्षप्रवेश होत आहे. नजीकच्या काळात अनेक प्रवेश होणार आहेत. वेगवेगळ्या पक्षांतील, समाजांतील येणाऱ्या घटकांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. आदिवासी सामाजामध्ये नेतृत्व करणारे दया पवार यांना त्या समाजाचे शिवसेना अध्यक्ष पद मिळावे, अशी विनंती मंत्री भरत गोगावले यांच्याकडे करीत निवडणुकीत सर्व जागांवर निश्चित विजयाचा झेंडा फडकवणार, असे शिवसेना तालुकाप्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.