राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वन्यजीवांची ओळख
विद्यार्थ्यांना वन्यजीवांची ओळख
वनविभाग आणि वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर यांच्यामार्फत विशेष चर्चासत्र
माणगाव, ता. ११ (वार्ताहर) ः वनविभागामार्फत राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूल, म्हसळा येथे मंगळवार (ता. ७) कार्यक्रमात माणगावचे वन्यजीव अभ्यासक शंतनू कुवेसकर यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीवांची माहिती दिली. त्यांनी महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू, राज्यपक्षी हरियाल, राज्य फुलपाखरू निळवंत आणि धनेश पक्षी, गिधाडे आणि जिल्ह्यात आढळणाऱ्या इतर वन्यजीवांबद्दल माहिती दिली. रायगड जिल्ह्याचा जिल्हा पक्षी याबद्दलही विद्यार्थ्यांना ज्ञान मिळाले.
म्हसळ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पांढरकामे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाची प्रस्तावना वनरक्षक दीपक तेटगुरे यांनी केली. तर वनरक्षक भीमराव सूर्यतळ यांनी पेटी वाजवत वन्यजीवांवरील पोवाडा सादर केला. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. शंतनू कुवेसकर यांनी वन्यजीव सप्ताहची थीम सेवा पर्वप्रमाणे निसर्गाप्रति सेवा आणि आपल्या जबाबदारीवर लक्ष केंद्रित करण्याची प्रतिज्ञा उपस्थित सर्व विद्यार्थ्यांकडून करून घेतली.
वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पांढरकामे, वनपाल वैभव शिंदे, दिलीप वाघे, तुळशीराम चावरेकर, महादेव कराडे, सुभाष शिंदे, बापू रामोळे, विद्यासागर गोसावी आणि वनरक्षक दीपक तेटगुरे, भीमराव सूर्यतळ, लक्ष्मण राठोड, किरण बिन्नर, गजानन लालछोटे, शशिकांत चेवले, प्रदीप कोरडे, सचिन चव्हाण, प्रियांका जाधव, दीपाली मोहोळकर, जनाबाई गुद्दे, चरणदास चव्हाण, सागर घुबे, ऋषिकेश ढाकणे आणि न्यू इंग्लिश स्कूल चे प्राचार्य धरमचंद्र पाटील, पर्यवेक्षक जितेंद्र मांजरेकर, शिक्षक हणमंत मोरे, हरिश्चंद्र मुंडे, ज्ञानेश्वर आमले, रवींद्र गांगुर्डे, संजय वसावे, लालचंद सहारे, वसंत कामडी, निलेश गर्जे व शिक्षिका संगीता शिर्के, रुपाली पाटील आदी मान्यवर आणि शाळेचे सर्व विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.
माणगाव ः शंतनू कुवेसकर यांसोबत वन विभागाचे अधिकारी वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक व विद्यार्थी, शिक्षकवृंद.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.