ठाण्यात ऑक्सिजन पार्क

ठाण्यात ऑक्सिजन पार्क

Published on

ठाण्यात ऑक्सिजन पार्क
१०० हून अधिक औषधी वनस्पतींची लागवड
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : ठाणे पालिकेकडून ठाणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. अशातच आरोग्याची काळजी घेत, विरंगुळादेखील व्हावा, या उद्देशाने पालिकेने हिरानंदानी मेडोज परिसरात राजमाता जिजाऊ उद्यानात ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली आहे. या उद्यानात ‌‌विविध प्रजातीची व औषधी अशी १०० हून अधिक झाडांची लागवड केली असून, ७५ वर्षे जुन्या वड आणि पिंपळ झाडांचे जतन करण्यात आले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मॉर्निंगवॉक, योगा, व्यायाम करण्याच्या व्यवस्थेसह बांबू पथ, छोट्या तलाव सौंदर्यीकरण करण्यात आले असल्याची माहिती पालिकेने दिली.
ठाणे पालिका क्षेत्रातील अस्तित्वात असलेल्या उद्यानांचा कायापालट पालिकेच्या उद्यान विभागामार्फत करण्यात येत आहे. त्यानुसार पोखरण दोन भागातील हिरानंदानी मेडोज परिसरात पालिकेचे सुमारे साडेतीन एकर जागेत राजमाता जिजाऊ उद्यान असून, या ठिकाणी केवळ झाडांची लावगड करण्यात आलेली होती. पालिकेने या उद्यानाचे नुकतेच नूतनीकरण केले असून, त्यात येथे ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली आहे. या उद्यानाला राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क असे नाव दिले आहे.
संपूर्ण उद्यान फुलझाडांनी, औषधी वनस्पतींनी आणि हिरवाईने नटलेले असेल. या झाडांमुळे परिसरातील हवामान अधिक शुद्ध होईल. नागरिकांना सकाळ आणि संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी शुद्ध वातावरण मिळेल. तसेच लहानसा तलाव तयार करण्यात आला असून, त्या ठिकाणी जलचर प्राणी ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांना योगा आणि व्यायाम करता यावा, यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. पक्ष्यांना त्रास होऊ नये म्हणून विद्युत दिवे कमी उंचीवर बसविण्यात आलेले आहेत. मार्गालगत बांबूची लागवड करण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेचे उद्यान विभागाचे उपायुक्त मधुकर बोडके यांनी दिली.

‘या’ औषधी वनस्पतींची करणार लागवड
गुडमार, अडुळसा, अननस, हळद, सिट्रोनेला, बासमती-अन्नपूर्णा गवत, वाळा, जास्वंद, डिकेमाली, हिरवा चाफा, कापूर, बारतोंडी, अळीव, अंबाडा, कुंकू, नीरफणस, गोकर्ण, जायफळ, काळी मिरी, चंदन, दमवेल, धावडा, बिब्बा, शेंदरी, बिलिंबी, अंकोळ, आपटा, बेल, रुद्राक्ष, रायआवळा, पिवळा कांचन, शेर, करवंद, कृष्णकमळ, भद्राक्ष, मंदार-रुई, गुलाब, जांभूळ (पांढरा), निरगुडी, गुळवेल, पुदिना, हाडजोड, गुंज, केवडा, मुरूडशेंग, वेखंड, शतावरी, शिवन अशा औषधी वनस्पतींची उद्यानात लागवड करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com