उल्हासनगरात बनावट आदेशाच्या आधारे मिळवली पदोन्नती, मध्यवर्ती पोलिसांकडून शिक्षकाला अटक
उल्हासनगरात शिक्षण क्षेत्राला हादरा!
बनावट आदेशाच्या आधारे मिळवली पदोन्नती, पोलिसांकडून शिक्षकाला अटक
उल्हासनगर, ता. १० (वार्ताहर) ः कॅम्प क्रमांक तीन येथील गुरू गोविंदसिंग हिंदी हायस्कूलमध्ये बनावट कागदपत्रे आणि खोट्या आदेशाच्या आधारे शिक्षकाने पर्यवेक्षकपदावर पदोन्नती मिळवल्याचा एक धक्कादायक घोटाळा उघडकीस आला आहे. याप्रकरणी राजेशकुमार तिवारी नावाच्या शिक्षकाला मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली आहे.
उल्हासनगर टीचर्स एज्युकेशन सोसायटीच्या अखत्यारीत असलेल्या या शाळेत बडतर्फ मुख्याध्यापक त्रिभुवनदास तिवारी, त्यांचा भाऊ राजेशकुमार तिवारी (अटक झालेला शिक्षक) आणि प्रभारी मुख्याध्यापिका सुनीता चंद्रमौली सिंग यांनी संगनमत करून हा फसवणुकीचा डाव रचला. संस्थेच्या अध्यक्षा परविंदरकौर मुधर यांनी केलेल्या तक्रारीनुसार, या तिघांनी मिळून संस्थेचे बनावट लेटरहेड तयार केले आणि खोटा पदोन्नती आदेश जारी केला. या आदेशात राजेशकुमार तिवारी यांना शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद ठाणे यांचे नाव वापरून १५ जुलै २०२५ पासून पर्यवेक्षकपदी पदोन्नती मिळाल्याचे दर्शवण्यात आले होते; मात्र तपासामध्ये हा दस्तऐवज पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
मुख्य आरोपी अद्याप फरार
संस्थेची दिशाभूल केल्याबद्दल आणि शिक्षण विभागाची फसवणूक केल्याबद्दल मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शिक्षक राजेशकुमार तिवारी यांना पोलिसांनी अटक केली आहे; मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी बडतर्फ मुख्याध्यापक त्रिभुवनदास तिवारी आणि प्रभारी मुख्याध्यापिका सुनीता सिंग हे दोघेही फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकारामुळे उल्हासनगरमधील शिक्षण क्षेत्राच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, या घोटाळ्यात आणखी कोणी सामील आहे का, याचा कसून तपास पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.