गांजाचे सेवन करणारे दोघे ताब्यात
गांजाचे सेवन करणारे दोघे ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
ठाणे,(ता.११) : पावसाळ्यात मैदानात उगावलेल्या झाडाझुडुपाच्या आडोश्याला गांजा सेवन करणाऱ्या अजय झा(२३) आणि नितेश यादव (३०) या दोघांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेत, चितळसर मानपाडा पोलिसांच्या हवाली केले. वैद्यकीय तपासणी त्यांनी अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाणे खंडणी विरोधी पथकाचे पेट्रोलिंग करताना वसंत विहार सर्कल जवळील मोकळ्या मैदानात झाडाझुडुपाच्या आडोश्याला दोन इसम गांजाचे सेवन करत असल्याची माहिती बुधवार (ता.८) मिळाली होती, त्यानुसार पाहणी करताच तेथे ते दोघे सेवन करताना मिळून आले. त्यांनी गांजा सेवन केल्याची कबुली दिली. दरम्यान घटनास्थळीच सेवन करण्यासाठी लागणारे साहित्य नष्ट करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी चितळसर मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील वरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.