जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Published on

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
४०७ संघांमधून पाच हजारांहून अधिक मुला-मुलींचा सहभाग

कल्याण, ता. ११ (वार्ताहर) ः क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने, महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा २०२५-२६चे आयोजन ६ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत डॉन बॉस्को स्कूल, आधारवाडी, कल्याण (पश्चिम) येथे करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत १४, १७ आणि १९ या वयोगटातील, एकूण ४०७ संघांमधून ४,८०० ते ५,००० मुले व मुलींनी उत्साहाने सहभाग नोंदवला. मागील वर्षाप्रमाणेच या स्पर्धा मॅटवर खेळविण्यात आल्या आणि कबड्डी संघटनेच्या अधिकृत पंचांच्या माध्यमातून या यशस्वीरीत्या पार पडल्या.

सर्व विजेत्या स्पर्धकांना चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच पंच, मदतनीस आणि खेळ प्रमुख यांचे मानधन स्पर्धेच्या ठिकाणीच देण्यात आले. या वेळी क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त संजय जाधव, क्रीडा पर्यवेक्षक प्रवीण कांबळे, डॉन बॉस्को स्कूलचे ट्रस्टी जॉन सर, खेळप्रमुख रेणुका पिसे, सूरज जाधव, आकाश गायकवाड, ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अनिल शेजवळ, क्रीडा समिती सदस्य कृष्णा बनगर, विजय सिंग, कृष्णा माळी, संतोष पाटील (क्रीडा विभाग) तसेच सहभागी शाळांचे क्रीडा शिक्षक आणि शिक्षण व क्रीडा विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


स्पर्धेतील विजेते संघ
वयोगट गट प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक
१४ वर्षे मुले पाटील बालमंदिर मराठी डॉन बॉस्को हायस्कूल, कल्याण स्वामी विवेकानंद, दत्तनगर
१४ वर्षे मुली स्वामी विवेकानंद, दत्तनगर डॉन बॉस्को हायस्कूल, कल्याण रिता मेमोरियल
१७ वर्षे मुले के. व्ही. पेंढारकर कॉलेज, डोंबिवली डॉन बॉस्को हायस्कूल, कल्याण कॅप्टन रवींद्र स्कूल, कल्याण
१७ वर्षे मुली प्रगती कॉलेज, डोंबिवली विद्यामंदिर, मांडा-टिटवाळा आनंद ग्लोबल स्कूल, कल्याण
१९ वर्षे मुले बी. के. बिर्ला कॉलेज, कल्याण के. एम. अग्रवाल कॉलेज बी. आर. मढवी कॉलेज
१९ वर्षे मुली प्रगती कॉलेज, डोंबिवली के. व्ही. पेंढारकर कॉलेज अचिवर्स हायस्कूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com