मुंबई
पालघर जिल्ह्यातून मॉन्सून परतला
वाणगाव, ता. ११ (बातमीदार) : उत्तर कोकणातील पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे व रायगड जिल्ह्यातून नैऋत्य मॉन्सून परतल्याची माहिती शुक्रवारी (ता. १०) भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे पुढील चार दिवस पालघर जिल्ह्यात पूर्णपणे उघडीप राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे. त्यासोबत कमाल तापमानात वाढ होवून कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. अचानक तापमान वाढल्याने आर्द्रतेत वाढ दिसून येईल व सकाळची आर्द्रता ९९ ते १०० टक्के राहण्याचा अंदाज आहे, तसेच वाऱ्याची गती पाच ते सहा किमी प्रति तास राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्रातील कृषी हवामान तज्ज्ञ रिझवाना सय्यद यांनी दिली.