कर्जतकरांसमोर कोंडीचे आव्हान
कर्जतकरांसमोर कोंडीचे आव्हान
राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे काम रखडल्याने मनस्ताप
कर्जत, ता.११ (बातमीदार)ः कर्जत शहरालगत असलेल्या उल्हास नदीवरील श्रीराम पुलाच्या शेजारी नव्या पुलाचे काम सुरू आहे. पण हे काम अतिशय संतगतीने सुरू असल्याने सुट्टीच्या दिवशी, विशेषतः शनिवार-रविवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
निसर्गरम्य भाग असल्याने कर्जत तालुक्यात मुंबईतील नागरिकांची फार्महाऊसे आणि रिसॉर्ट मोठ्या प्रमाणात आहेत. आठवड्याच्या शेवटी मुंबईहून येणाऱ्या वाहनांची गर्दी वाढते. खोपोली, मुरबाड, बदलापूर दिशेने जाणारी वाहने याच मार्गावरून जातात. त्यामुळे वाहतुकीचा ताण दुपटीने वाढतो. या कोंडीचा सर्वाधिक फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसत आहे. उल्हास नदीच्या पलीकडील दहिवली तसेच आसपासच्या भागातून शहरातील शाळांमध्ये जाणारे विद्यार्थी रिक्षा, बसने किंवा खासगी वाहनांनी येत असतात. मात्र, पुलावरील वाहतूक कोंडीमुळे दररोज अर्धा ते एक तास उशीर होतो. सध्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना समस्येला सामोरे जावे लागले आहे.
-------------------------
आठवडा बाजाराने भर
- या मार्गालगत रस्त्याचे काँक्रीटचे काम सुरू असल्याने एक बाजूचा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या अधिकच वाढली आहे. तसेच वाहतूक नियंत्रक नसल्याने विविध अडचणी येत आहेत.
- शनिवारच्या दिवशी लाडिवलीपर्यंत बाजार भरत असल्याने वाहने रांगेत उभी राहतात. त्यामुळे बाजार शनिवारऐवजी दिवशी भरवावा, जेणेकरून कर्जत शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.