करंजाडे वडघर हद्दीतील खड्डे बुजविण्यास सुरुवात..
करंजाडे वडघर हद्दीतील खड्डे बुजविण्यास सुरुवात
सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीला यश
पनवेल, ता. ११ (बातमीदार) ः करंजाडे येथील वडघर ते कॉलेजफाटा रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. यामुले नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. येथील खड्डे बुजविण्याबाबत सरपंच, उपसरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी सिडकोकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
पनवेल महापालिका हद्दीतून उरणकडे जाणाऱ्या गाढी पुलानजीक खड्डे पडले होते. या खड्ड्यातून वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत होती. परिणामी, वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. याबाबत वाहनचालकांनी करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार, माजी सरपंच रामेश्वर आंग्रे त्याचबरोबर समाजसेवक कुणाल लोंढे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. याबाबत आंग्रे, शेलार, लोंढे यांनी विमानतळ विभाग सिडको यांच्याकडे पत्रव्यवहार करून खड्डे दुरुस्त करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. सिडको अधिकाऱ्यांनी याची दखल घेत शुक्रवारी (ता. १०) रात्रीच्या सुमारास धोकादायक खड्डे दुरुस्त करण्यास सुरुवात केली आहे.
करंजाडे वसाहतीमध्ये जिथे जिथे खड्डे असतील तेथील माहिती घेऊन सिडकोच्या माध्यमातून पाठपुरावा करून करंजाडे वसाहत खड्डेमुक्त करू.
- मंगेश शेलार, सरपंच, करंजाडे
वडघर हद्दीमध्ये खड्डे पडले होते, याबाबत सिडकोच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करून प्रत्यक्षात खड्डे बुजविले असल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. यातच आमचे समाधान आहे.
- रामेश्वर आंग्रे, माजी सरपंच, करंजाडे
वडघर हद्दीतील धोकादायक खड्डे दुरुस्त करावे, यासाठी सिडकोच्या दरबारी वारंवार पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरूच होता. या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत होती. आता वाहतूक कोंडीही होणार नाही. अखेर सिडकोने खड्डे दुरुस्त करण्यास सुरुवात केली आहे.
- कुणाल लोंढे, समाजसेवक, वडघर-करंजाडे
फोटो नंबर १ सरपंच मंगेश शेलार
फोटो नंबर २ माजी सरपंच रामेश्वर आंग्रे
फोटो नंबर ३ खड्डे दुरुस्त
फोटो नंबर ४ समाजसेवक कुणाल लोंढे
फोटो नंबर ५ खड्डे दुरुस्त