मुंबई
आदिवासी पाड्यात शैक्षणिक साहित्य वाटप
आदिवासी पाड्यात शैक्षणिक साहित्य वाटप
खारघर (बातमीदार) ः एसबीएम बँकेचे माजी उपाध्यक्ष प्रशांत कदम यांनी आदिवासी पाड्यात शैक्षणिक साहित्य वाटप केले. खारघरमधील घोळवाडी आदिवासी पाड्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश पेडामकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदर्श सेवाभावी संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.