कळंबोलीतर्फे पूरग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात

कळंबोलीतर्फे पूरग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात

Published on

सकल मराठा समाज कळंबोलीतर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात
पनवेल, ता. ११ (बातमीदार) : सकल मराठा समाज, कळंबोली यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील सुल्तानपूर (राहुलनगर) या पूरग्रस्त भागात मदतकार्य करण्यात आले. पूरग्रस्त शेतकरी बांधवांना आवश्यक असणारे घरगुती साहित्य (संपूर्ण किट), महिलांसाठी साड्या, पुरुषांसाठी पॅन्ट-शर्ट, लहान-मोठ्या मुलांसाठी कपडे, सॅनिटरी पॅड आणि विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी साहित्य अशा विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात एकूण १०० मदत किट तयार करून प्रत्यक्ष पूरग्रस्त बांधवांच्या घरी जाऊन त्यांना वितरित करण्यात आल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक किरण नागरगोजे यांनी दिली. समाजातील विविध मदतकर्त्यांनी आपापल्या परीने दिलेल्या योगदानामुळे हे मदतकार्य शक्य झाले. या सामाजिक उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे व मदतकर्त्यांचे आभार मानण्यात आले. समाजातील एकजूट आणि परस्पर सहकार्याच्या बळावर संकटाच्या काळातही मानवतेचा दीप प्रज्वलित ठेवण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Marathi News Esakal
www.esakal.com