११ वर्षीय अमुल्या शाह हिचा दिल्ली स्विमेथॉनमध्ये पराक्रम

११ वर्षीय अमुल्या शाह हिचा दिल्ली स्विमेथॉनमध्ये पराक्रम

Published on

११ वर्षीय अमुल्याचा स्विमेथॉनमध्ये पराक्रम
१० किमी खुल्या गटात प्रथम, ५०० मीटरमध्ये तृतीय क्रमांक
पनवेल, ता. १३ (वार्ताहर) : नवीन पनवेल येथील अमुल्या शाह हिने दिल्ली येथे पार पडलेल्या इंटरनॅशनल स्विमेथॉन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या स्पर्धेत अमुल्याने १० किलोमीटर खुल्या गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे, तर ५०० मीटर स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवत दुहेरी यश संपादन केले.
अमुल्या ही या स्पर्धेतील १० किलोमीटर खुल्या गटात उतरणारी आणि विजेतेपद मिळवणारी सर्वात लहान स्पर्धक ठरली आहे. तब्बल ४ तास ३० मिनिटांत पोहून प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या जिद्द, चिकाटी आणि उत्कृष्ट तंत्रज्ञानाचे सर्व स्पर्धक व आयोजकांनी मनापासून कौतुक केले. अमुल्या शाह ही एमएनआर इंटरनॅशनल स्कूल, पळस्पे येथे पाचवीत शिकत असून तिच्या या यशामागे कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com