पर्यावरणीय क्षेत्रात पालिकेची कामगिरी

पर्यावरणीय क्षेत्रात पालिकेची कामगिरी

Published on

पर्यावरणीय क्षेत्रात पालिकेची कामगिरी
हरित यशोगाथा सन्मान देऊन कार्याचा गौरव
पनवेल, ता. १४ (बातमीदार) : पर्यावरण संवर्धन, हवामान बदल नियंत्रण आणि हरित उपक्रमांत सलग तिसऱ्या वर्षी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पनवेल महापालिकेला राज्यस्तरीय ‘माझी वसुंधरा अभियान हरित यशोगाथा सन्मान २०२५’ प्रदान करण्यात आला आहे.
हा मान पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय यांच्या वतीने १४ ऑक्टोबर रोजी बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे झालेल्या आयएफएटी इंडिया २०२५ या कार्यक्रमात राज्य वातावरणीय कृती कक्षाचे संचालक अभिजित घोरपडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पनवेल महापालिकेच्या वतीने उप आयुक्त स्वरूप खारगे, पर्यावरण विभागप्रमुख मनोज चव्हाण आणि माझी वसुंधरा सल्लागार युवराज झुरंगे यांनी हा सन्मान स्वीकारला. तीन लाख ते १० लाख लोकसंख्येच्या अमृत शहरे गटात पनवेल महापालिकेने सर्व थिमॅटिक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करीत पर्यावरणपूरक प्रकल्पांची अंमलबजावणी केली. वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन, हरित ऊर्जा तसेच नागरिकांच्या सहभागातून पर्यावरण जनजागृती यासारख्या क्षेत्रांत केलेल्या प्रभावी कामगिरीची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली. राज्य शासनाकडून मिळालेला हा सन्मान पनवेल महापालिकेच्या हरित कार्यसंस्कृतीचा आणि नागरिकांच्या पर्यावरणप्रेमाचा गौरव असल्याचे आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले. हा सन्मान पनवेल शहराच्या शाश्वत विकास प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
.............
कोट
पनवेल महापालिकेच्या सर्व विभागांच्या आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांतून हे यश मिळाले आहे. पर्यावरण संवर्धन हा केवळ एक उपक्रम नसून आपली जबाबदारी आहे. ‘माझी वसुंधरा अभियान’च्या माध्यमातून आपण हरित, स्वच्छ आणि शाश्वत पनवेल घडविण्याच्या दिशेने सतत पुढे जात राहू.
- मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका
...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com