भोंडल्याच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती
भोंडल्याच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती
शिवसेना महिला आघाडी शहर शाखेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन
कल्याण, ता. १४ (वार्ताहर): राज्य सरकारच्या माध्यमातून महिला आणि सामान्य नागरिकांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती शिवसेनेच्या वतीने ‘भोंडल्या’च्या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचवण्यात आली. शिवसेना कल्याण पूर्व महिला आघाडी शहर शाखेच्या वतीने कल्याण पूर्वेतील कशिश हॉटेल येथे महिलांसाठी महाभोंडला, हळदी-कुंकू कार्यक्रम व वेशभूषा स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, महिला आघाडी जिल्हाप्रमुख छाया वाघमारे आणि शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख नीलेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला.
वैशाली लांडगे, मीना वाळेकर, मालती पवार, मनीषा भानुशाली, नेहा शेट्टी, अनिता लव्हटे, चिकनकर, राधिका कुलकर्णी, दीपाली तेलुरे आदी शिवसेना महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. महिला जिल्हाप्रमुख छाया वाघमारे, पुष्पा ठाकरे, राधिका गुप्ते, माधुरी काळे, राजवंती मढवी, सारिका जाधव, पल्लवी बांदोडकर, संगीता गायकवाड आदी महिला पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच, शहरप्रमुख नीलेश शिंदे, माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी, नवीन गवळी, रमाकांत देवळेकर, हर्षवर्धन पालांडे यांच्यासह सर्व महिला उपशहरप्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमात महिलांनी पारंपरिक भोंडला गाणी, हळदी-कुंकू विधी आणि वेशभूषा प्रदर्शनाद्वारे आपली सांस्कृतिक विविधता सादर केली. वेशभूषा स्पर्धेतील ‘केळंबा देवी खरोशी मंदिर’ या थीमवर आधारित वेशभूषा विशेष आकर्षणाचे केंद्र ठरली. हा पेहराव रायगड जिल्ह्यातील पेणजवळील खरोशी गावात असलेल्या देवीच्या एका अद्वितीय रूपाला समर्पित होता. कार्यक्रमाच्या शेवटी, वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतिचिन्हे आणि भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच, उपस्थित सर्व महिलांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून दिवाळी भेट म्हणून पैठणी साड्या प्रदान करण्यात आल्या, ज्यामुळे महिलांचा आनंद द्विगुणित झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.