अलिबागमध्ये आपत्ती निवारण दिनानिमित्त प्रात्यक्षिक शिबिर

अलिबागमध्ये आपत्ती निवारण दिनानिमित्त प्रात्यक्षिक शिबिर

Published on

अलिबागमध्ये आपत्ती निवारणदिनानिमित्त प्रात्यक्षिक शिबिर
अलिबाग, ता, १५ (वार्ताहर) ः प्रीझम अकादमी आणि भारत सरकारच्या मेरा युवा भारत गृह मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आपत्ती निवारणदिनानिमित्त प्रात्यक्षिक शिबिराचे आयोजन केले होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रा. डॉ. जयपाल पाटील, प्रा. शाम जोगळेकर, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी व अकादमी अध्यक्षा तपस्वी गोंधळी, तसेच संचालिका सुचिता साळवी उपस्थित होत्या.
कार्यक्रमात संविधान वाचन करून विजेच्या सुरक्षिततेसाठी दामिनी अ‍ॅप, वाहन परवान्याचे नियम, वीज पडून मृत्यू झाल्यास गोपीनाथ मुंडे विमा योजनातून मिळणारी मदत, महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस ११२ क्रमांकाचा वापर, अपघात वा सर्पदंशासारख्या प्रसंगी १०८ रुग्णवाहिकेच्या सेवेचा योग्य वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
या प्रात्यक्षिकावेळी १०८ सेवेचे रायगड उपप्रमुख अजय जगताप यांना संपर्क केल्यानंतर डॉ. जयप्रकाश पांडे आणि पायलट सुशांत पाटील तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्रसंगी वृद्ध व्यक्ती किंवा बाळंतपणासाठी जाणाऱ्या महिलेला कसे सुरक्षित नेले जाते, याचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. प्रा. डॉ. जयपाल पाटील यांनी आपली विनोदी लाडू कविता सादर करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. या कार्यशाळेत एकूण १०० विद्यार्थी सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com