शक्तीस्थळ राखण्याचे आव्हान

शक्तीस्थळ राखण्याचे आव्हान

Published on

शक्तीस्थळ राखण्याचे आव्हान
जिल्हा परिषद, पंचायत समितीत शेकापची कसोटी
वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता.१५ ः रायगड जिल्ह्याच्या राजकारणावरशेतकरी कामगार पक्षाचा पूर्वी प्रभाव होता. पनवेल, अलिबाग, उरण, खालापूर, मुरुड तालुक्यांमध्ये पक्षाची ताकद होती. विधानसभेबरोबरच ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा शेकापचे शक्तीस्थळ मानले जाते होते. पण पक्षफुटीमुळे भाजपसारख्या प्रस्थापित पक्षाबरोबर लढताना विविध आव्हानांचा सामना करण्याची वेळ येणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शेकाप पक्षाला पसंती दिली जात होती. २०१७ ला पनवेलमधील सहा सदस्य पाठवून शेकापने ताकद दाखवली होती. त्यामुळे पक्षाच्या संख्याबळात वाढ झाली. तर पनवेल तालुक्यात भाजपची सरासरी कामगिरी होती. मात्र, जिल्हा परिषेद फक्त दोनच जागेवर पक्षाला समाधान मानावे लागले होते. लिना पाटील, विनोद साबळे यांच्यासह दिग्गज उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. आणखी काही जागा निवडून येतील, अशी अपेक्षा पक्षाच्या नेत्यांना होती. पण पंचायत समितीत पक्षाने चांगली मुसंडी मारली. काही गणात अतिशय कमी मताने उमेदवारांचा पराभव झाला होता. सात वर्षानंतर पुन्हा एकदा पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. पण या कालावधीमध्ये झालेल्या राजकीय बदलांमुळे शेतकरी कामगार पक्षाला मोठ्या प्रमाणात ओहोटी लागली आहे.
--------------------------
पक्ष नेतृत्त्वाचा अभाव
पनवेलच्या शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील पक्षाचे शिलेदार भाजपवासी झाले आहेत.जिल्ह्यात पक्षाचे नेतृत्व करणारे माजी आमदार विवेक पाटील सध्या कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी कारागृहात आहे. माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यांनी भाजपचे कमळ स्वीकारले आहे. त्यांच्या समवेत शहरी आणि ग्रामीण अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे १६ पंचायत समिती, आठ जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये भाजपकडे इच्छुकांची संख्या वाढली आहे. तर शेतकरी कामगार पक्षामधून मात्र अद्यापही चाचपणी झाल्याचे दिसून येत नाही.
------------------------------
चिन्ह नसल्याने तारेवरची कसरत
शेतकरी कामगार पक्षाचे खटारा आहे चिन्ह गोठवण्यात आले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पक्षाला निश्चित असे चिन्ह मिळाले नाही. त्यामुळे निवडणूक विभागाने दिलेल्या चिन्हावरच उमेदवारांना निवडणूक लढवावी लागेल. ही निशाणी मतदारांपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान भाजपसारख्या तगड्या प्रतिस्पर्धीसमोर आव्हानात्मक आहे. तर आरक्षणांमुळे इच्छुकांच्या पदरी निराशा आली आहे.
----------------------------
विखुरलेली पक्षीय ताकद
पनवेल तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची विभागणी झाली असली तरी आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये प्रमुख विरोधी पक्ष म्हणून शेकापच असणार आहे. तर भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांची लढत होणार आहे. महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा काही प्रमाणात प्रभाव आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ग्रामीण भागात फारसा दिसून येत नाही. तिच स्थिती महायुतीमध्ये आहे. शिंदे सेना शहरात असली तरी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रभाव नाही. तर अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा कुठेच दिसत नाही.
---------------------------------
पंचायत समिती, जिल्हापरिषदेसाठी शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण आहे. काही नेते जरी दुसऱ्या पक्षात गेले तरी मतदार हा पक्षासोबत ठाम उभा आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार आहे.
- राजेश केणी, माजी उपसभापती, पंचायत समिती, पनवेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com