शेतीने घरखर्चाचे गणित बिघडले

शेतीने घरखर्चाचे गणित बिघडले

Published on

शेतीने घरखर्चाचे गणित बिघडले
मुरूड तालुक्यात भातकापणीसाठीच्या मजुरीत वाढ
मुरूड, ता. १५ (बातमीदार)ः तालुक्यातील ३३०० हेक्टर क्षेत्रावरील भाताचे यंदा चांगले हवामान, पावसामुळे चांगले उत्पादन येण्याची शक्यता आहे, पण यंदा शेतीच्या कामांसाठी मजुरी वाढल्याने ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतरही भातकापणीची कामे फक्त १० टक्के इतकीच झाली आहेत.
मुरूड तालुक्यात ३००० मिलिमीटर इतके पर्जन्यमान झाले आहे. पाऊस चांगला झाल्यामुळे भातावर रोगाचा प्रादुर्भाव झालेली नाही, पण आता थंडी पडायला सुरुवात झाल्याने शेतकरी भातकापणीनंतर कडवे वाल, चवळी, मूग आदी कडधान्य पेरणीच्या तयारीत आहेत. उखारु जमिनीवरील हळव्या भाताची कापणी, झोडणीचे काम सुरू असून खार पट्ट्यातील तर खोलगट भागातील गरवे भात कापणीला आला आहे, पण मजुरी वाढली असल्याने त्याचा फटका शेतकऱ्याला बसत आहे. सध्या पुरुषांसाठी ६०० रुपये, तर महिलांसाठी ३०० रुपये मजुरी चुकवावी लागत आहे. त्यामुळे खर्चाचा ताळमेळ बसवताना बळीराजाला कसरत करावी लागत आहे.
------------------
शेती परवडत नसल्याची ओरड
भातशेतीला लागवडपूर्व व लागवडीनंतर मशागत, बियाणे, खते, मजुरीचा विचार करता खर्चाचा ताळमेळ बसवणे कठीण झाले आहे. यापूर्वी भातविक्रीसाठी रोहा तालुक्यात जावे लागत होते, मात्र चार वर्षांपासून मुरूड तालुक्यात पणन विभागातर्फे शासन भात खरेदी करत आहे, पण भाताला प्रतिक्विंटल २३०० चा भाव, दोन वर्षांपासून बोनस मिळत असला तरी शेती परवडत नसल्याची ओरड आहे.
़़़़़़़ः--------------------------
स्थलांतराचा फटका
पूर्वी नातेवाईक, कुटुंबातील माणसे एकमेकाला कापणी, बांधणी, उडवे रचण्याकामी परस्पर सहकार्य करत होते. त्याला ग्रामीण बोलीत ‘पटेल’ असे बोलतात, परंतु रोजगाराच्या शोधात असलेली ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे मुंबई, नवी मुंबईत स्थलांतरीत झाल्याने रोजंदारीचा खर्च वाढला आहे.
शेतीने घरखर्चाचे गणित बिघडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com