तीर्थक्षेत्र महड बसथांब्यावर कचऱ्याचा ढिग

तीर्थक्षेत्र महड बसथांब्यावर कचऱ्याचा ढिग

Published on

तीर्थक्षेत्र महड बसथांब्यावर कचऱ्याचा ढीग
असह्य दुर्गंधीमुळे भाविकांमध्ये नाराजी; परिसर स्‍वच्‍छ करण्याची मागणी
खालापूर, ता. १५ (बातमीदार) : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री वरदविनायकाच्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र महड येथे स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महड बसथांब्यालगत मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात येत असल्याने त्या ठिकाणी दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दररोज हजारो भाविक या पवित्र स्थळाला भेट देतात, मात्र प्रवेशद्वाराजवळ असलेल्या या अस्वच्छतेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या महड मंदिरात वर्षभर भाविकांची सतत गर्दी असते. महामार्गावरून महडकडे वळताना रस्त्यालगत प्लॅस्‍टिकचे, अन्नाचे अवशेष, पूजेचे साहित्य व इतर घनकचरा मोठ्या प्रमाणात फेकण्यात येतो. त्यामुळे केवळ पर्यावरणाचे नुकसान होत नसून, तर संपूर्ण परिसरात असह्य दुर्गंधी पसरल्याने रोगराई पसरण्याची भीती व्‍यक्‍त केली जात आहे. खोपोलीकडे जाण्यासाठी येथे थांबणाऱ्या प्रवाशांना तसेच महडमध्ये निवास करणाऱ्या भक्तांना या कचऱ्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी भटक्या प्राण्यांमुळे कचऱ्याचा ढीग अधिक पसरत असून, परिसर अस्वच्छ झाला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांनी या अस्वच्छतेबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत, मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. महड ग्रामस्थांनी हाळ ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांकडे स्वच्छता मोहीम राबवून कचरा नियमितपणे उचलण्याची मागणी केली आहे. महड हे पवित्र धार्मिक स्थळ असून, येथील स्वच्छता राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन परिसर स्वच्छ करण्याची मागणी जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com