‘नवरात्र-नवरंग’ पैठणी स्पर्धेला प्रतिसाद

‘नवरात्र-नवरंग’ पैठणी स्पर्धेला प्रतिसाद

Published on

‘नवरात्र-नवरंग’ पैठणी स्पर्धेला प्रतिसाद
बक्षीस वितरण सोहळ्यात स्त्रीशक्तीचा जल्लोष
पनवेल, ता. १५ (बातमीदार) : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सकाळ माध्यम समूह आणि श्री दीपक साडीज, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नवरात्र-नवरंग पैठणी स्पर्धा’ यशस्वीपणे पार पडली. या अनोख्या उपक्रमाचा बक्षीस वितरण सोहळा अलीकडेच श्री दीपक साडीजच्या दालनात मोठ्या उत्साहात पार पडला. पनवेल, नवी मुंबई, उरण, खोपोली आणि खालापूर परिसरातील शेकडो महिलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
नवरात्रीतील नऊ रंग हे केवळ धार्मिक परंपरा नसून, महिलांमधील एकता, आनंद आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहेत. या रंगोत्सवातून स्त्रीशक्तीचा गौरव साजरा करण्याचा प्रयत्न सकाळ माध्यम समूह आणि दीपक साडीजच्या माध्यमातून करण्यात आला. ‘नवरात्र नवरंग उत्सव’ या स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून, महिलांना नऊ दिवसांमध्ये विविध रंगांच्या पेहरावातून आपली कलात्मकता दाखविण्याची संधी मिळाली. या वर्षीही या उपक्रमाला महिलावर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बक्षीस वितरण समारंभात २० विजेत्या महिलांना आकर्षक पैठणी साड्या बक्षीस म्हणून देण्यात आल्या. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून कवयित्री व साहित्यिक लक्ष्मी यादव आणि सामाजिक कार्यकर्त्या संगीता भोसले उपस्थित होत्या. त्यांनी महिलांच्या भूमिकेचा गौरव करीत त्यांच्या आत्मविश्वास, स्वावलंबन आणि सामाजिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक गृहिणींनी घर आणि नोकरीच्या जबाबदाऱ्यांमधून वेळ काढून या उपक्रमात सहभाग घेतल्याबद्दल ‘सकाळ’ समूहाचे आभार मानले. श्री दीपक साडीजचे मालक निखिल सोनी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यामुळे पनवेलमध्ये नवरात्रोत्सवाचा उत्साह आणखी रंगतदार झाला असून, स्त्रीशक्तीचा सन्मान आणि एकजुटीचा संदेश यशस्वीपणे पोहोचवण्यात या उपक्रमाने यंदाही आपला ठसा उमटविला.
...........
कोट
‘नवरात्र नवरंग पैठणी’ स्पर्धेमध्ये श्री दीपक साडीजला सहयोगी करून संधी दिल्याबद्दल ‘सकाळ’ माध्यम समूहाचे आभार. दांडगा जनसंपर्क असल्याने यापुढेही आम्ही ‘सकाळ’ समूहाच्या प्रत्येक कार्यक्रमासोबत काम करीत राहू.
-निखिल सोनी, श्री दीपक साडीज, पनवेल
............
कोट
नवरात्रोत्सवात दररोज एक असे नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या नेसणे म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच असते. त्यातही ‘सकाळ’ने पैठणी बक्षीस दिल्याने हा आनंद द्विगुणित झाला आहे. आम्हा स्त्रियांना ‘सकाळ’ माध्यम समूहाने एक प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
- सुरेखा पाटील, कळंबोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com