काेकण रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण आव्हानात्मक
काेकण रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण आव्हानात्मक
संताेषकुमार झा यांचे भाैगाेलिक अडचणींवर बाेट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : कोकण रेल्वेचा प्रवास तांत्रिक आणि संरचनात्मकदृष्ट्या उल्लेखनीय ठरला आहे; मात्र या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करण्यासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागेल, असे कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी सांगितले. पर्वत, दऱ्या आणि कठीण भौगोलिक रचनेमुळे हा प्रकल्प अत्यंत आव्हानात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले.
वाशी येथे कोकण रेल्वेच्या ३५व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बुधवारी झा बोलत होते. या वेळी रेल्वेच्या तीन दशकांच्या कामगिरीचा, नवीन प्रकल्पांचा आणि आगामी योजनांचा आढावा घेण्यात आला. झा म्हणाले, ‘कोकण रेल्वेचा प्रवास हा भारताच्या अभियांत्रिकी इतिहासातील मोठा टप्पा आहे. दुहेरीकरणासारख्या मोठ्या प्रकल्पासाठी अधिक वेळ, सखोल अभ्यास आणि आर्थिक नियोजन आवश्यक आहे. पर्वतीय प्रदेशामुळे तांत्रिक अडचणी येतात. सध्या मंगलोर ते मदुराई यादरम्यान दुपदरीकरणाचा निर्णय घेतला असून, त्यासाठी २६५ कोटी रुपयांचा सर्व्हे हाती घेण्यात आला आहे. सर्व्हेचा अहवाल रेल्वे मंत्रालयाच्या परवानगीकरिता पाठविण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
---
७,७०० कोटींची मागणी
कोकण रेल्वेने वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, कार्यक्षम आणि आधुनिक बनविण्यासाठी मोठी योजना हाती घेतली आहे. ॲसेट रिप्लेसमेंट प्रकल्पाअंतर्गत जुन्या सिग्नल प्रणालीच्या जागी अत्याधुनिक प्रणाली बसविणे, नवीन रेल्वे रूळ टाकणे आणि जुन्या तपासणी कारच्या ऐवजी नवीन कार खरेदी करण्याची योजना आहे. या सर्व कामांसाठी ७,७०० कोटी रुपयांचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात आला असल्याचे कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी सांगितले.
---------
नेटवर्कच्या अडचणी
रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे बोगद्यात मोबाईल कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यासंदर्भात प्रश्न विचारले असता, सध्या कोकण रेल्वेकडे यासाठी कोणताही ठरावीक आराखडा नाही. त्यामुळे सध्या तरी कोणतीही योजना नसल्याचे झा यांनी स्पष्ट केले.
---------
४,२०२ कोटी रुपयांचा महसूल
गेल्या आर्थिक वर्षात कोकण रेल्वेने ४,२०२ कोटी रुपयांचा महसूल आणि १३७ कोटी रुपयांचा नफा नोंदवला. तसेच ४,१५७ कोटींचे नवे प्रकल्प हाती घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
---------
गणेशोत्सवात विक्रमी रेल्वेसेवा
गणेशोत्सव काळात कोकण रेल्वेने विक्रमी ३८१ विशेष गाड्या चालवून नऊ लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली. या वेळी प्रथमच रो-रो कार वाहतूक सेवाही सुरू करण्यात आली आहे.
---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.