ठाण्यात आगीच्या ५२६ घटना
ठाण्यात आगीच्या ५२६ घटना
अडकलेल्या ४६३ जणांची मृत्यूच्या दारातून सुखरूप सुटका
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : मुंबई शहराच्या बाजूला असलेल्या ठाणे शहराला बहुतांश नागरिकांकडून पहिली पसंती मिळत आहे. त्यामुळे ठाणे नगरीत वाढत्या नागरीकरणाने गगनचुंबी इमारतींच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यातच जीवनशैली बदलू लागल्याने वातानुकूलित यंत्राचा सर्रास वापरही वाढला आहे. दरम्यान, आगीच्या घटनांमध्ये शॉर्टसर्किटचे प्रकारही वाढू लागले आहेत. यानुसार ठाणे शहरात यावर्षी नऊ तासांत ५२६ घटनांची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षात झाली आहे. या घटनांमध्ये अग्निशामक जवानांनी मोठ्या धाडसाने ४६३ नागरिकांना मृत्यूच्या दारातून बाहेर काढून जीवदान दिले.
पावसाळ्यातील चार महिन्यांतील आगीच्या घटनांची सरासरी संख्या २५ इतकी आहे. उन्हाळ्याच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये मात्र तब्बल ३०९ आगीच्या लहान-मोठ्या घटनांची नोंद झाली आहे. या घटनांमध्ये एका महिलेचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले असून ४६३ जणांना मृत्यूच्या दारातून बाहेर काढण्यात यश आले. याचदरम्यान आगीच्या घटनांमध्ये तब्बल १२ मुक्या जीवांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, एका मुक्या जीवाला यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आले.
आगीच्या घटनांचा कॉल येताच अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान तत्काळ घटनास्थळी धाव घेतात. आगीदरम्यान धुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना तत्काळ धुरातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेण्यास प्राधान्य देण्यात येते. याशिवाय धीर देण्याचे काम केले जाते. तसेच जखमींना तत्काळ रुग्णालयात पाठवले जाते.
- यासीन तडवी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
आगीची आकडेवारी
महिने संख्या
जानेवारी ०७८
फेब्रुवारी १०६
मार्च ११९
एप्रिल ०८४
मे ०३६
जून ०२६
जुलै ०२५
ऑगस्ट ०२५
सप्टेंबर ०२४
एकूण ५२६
एकाच घटनेत ३७५ जणांचे वाचले प्राण
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ठाण्यातील कोलशेत एअर फोर्सजवळील कासा फ्रेस्को इमारतीच्या २२व्या मजल्यावर आग लागली होती. या वेळी मोठ्या प्रमाणात धूर झाला. २८व्या मजल्यावर राहणाऱ्या एका महिलेचा त्या वेळी गुदमरून मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. याचदरम्यान पसरलेल्या धुरामुळे अडकलेल्या त्या इमारतीमधील ३७५ लोकांची सुखरूप सुटका करण्यात यश आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.