मुंबई
हल्ला करुन दागिने लुटले
हल्ला करून दागिने लुटले
नवी मुंबई, ता. १९ (वार्ताहर) ः सीवूड्स येथे पामबीच मार्गालगत ६३ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचण्यात आली. शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी पामबीच मार्गावरील महापालिकेच्या सायकल ट्रॅकवर हा प्रकार घडला.
सीवूड्स सेक्टर ४४ मध्ये राहणाऱ्या सिल्विया डिसोझा (६३) पामबीच मार्गालगत असलेल्या सायकल ट्रॅकवरून फिरण्यासाठी जातात. नेहमीप्रमाणे फिरत असताना एकट्याच असल्याची संधी साधून एकाने त्यांच्या मानेवर जोराचा फटका मारला. त्यानंतर गळ्यातील पाच ग्रॅम वजनाची ६० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन खेचून कारमधून पालिका मुख्यालयाच्या दिशेने पलायन केले. या प्रकारानंतर सिल्विया यांनी आरडाओरड केली; मात्र तोपर्यंत लुटारू कारमधून पसार झाला होता. एनआरआय पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली.