ठाणे पालिकेची आर्थिक स्थिती डोलायमान

ठाणे पालिकेची आर्थिक स्थिती डोलायमान

Published on

ठाणे पालिकेची आर्थिक स्थिती दोलायमान
तरीही ५७५ कोटींच्या ७२ प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : कोरोना या महामारीपासून ठाणे पालिकेची आर्थिक स्थिती दोलायमान झालेली आहे. आजही पालिकेची आर्थिक स्थिती हवी तशी सुधारलेली नाही; तरीदेखील ५७५ कोटी रुपयांच्या ७२ प्रकल्पांना नुकत्याच झालेल्या प्रशासकीय महासभेत मान्यता दिली आहे. यात रस्ते, पाणी, नाले, ड्रेनेज, वीज, अग्निशमन केंद्र उभारणे यांसारखी कामे करणे क्रमप्राप्त असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
ठाणे पालिकेवर असलेले दायित्व कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. यानुसार अनेक खर्चिक व नवीन प्रकल्पांना कात्री लावत सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर पालिकेने भर दिला. असे असले तरी दुसरीकडे राज्य शासनाकडून रस्त्यांच्या कामांसाठी दोन टप्प्यांत ६०५ कोटी आणि शहर सुशोभीकरणासाठी १०० कोटींचा निधी दिला होता.
वाढत्या लोकसंख्येस आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांमार्फत विकासकामांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. यात रस्त्यांचे काँक्रीटीकरण, नाले व ड्रेनेज व्यवस्था, पाणीपुरवठा प्रणाली, तलाव पुनरुज्जीवन, सार्वजनिक इमारती बांधकाम, रुग्णालय विकास आणि शौचालय बांधणी यांसारख्या कामांचा समावेश आहे. या कामांसाठी केंद्र सरकारच्या विशेष सहाय्य योजना २०२५-२६ अंतर्गत राज्यांना मिळणाऱ्या बिनव्याजी कजार्साठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. हा निधी मंजूर होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. असे असताना दुसरीकडे पालिकेने स्वत:च्या निधीतून तात्पुरत्या स्वरूपात कामे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, पालिकेच्या अर्थसंकल्पात यासाठी पुरेशी तरतूद नसल्यामुळे कलम ७२ (ब) नुसार आर्थिक दायित्व स्वीकारण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. शहरातील सर्वांगीण विकास, खड्डेमुक्त रस्ते आणि सुसज्ज पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

‘हे’ आहेत मुख्य प्रकल्प
पाणीपुरवठा सुधारणा : टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर बेड्स, उत्तर-मध्य विभागातील पाइपलाइन विस्तार आणि २००० मिमी व्यासाच्या नवीन पाइपलाइन टाकण्याची कामे - एकूण खर्च अंदाजे ७५ कोटी रुपये.
नाले व ड्रेनेज कामे : रायलादेवी तलाव, सम्राटनगर नाला, शिवसेना स्मारकाजवळील पार्किंग नाला प्रकल्प यांसह सांडपाणी वाहिनी आणि हाउस कनेक्शन - ५० कोटी रुपये.
रस्ते व पूल विकास : एलबीएस रोड, तीन हात नाका, घोडबंदर सर्व्हिस रोड, माजिवडा-मानपाडा, मुंब्रा, दिवा इत्यादी ठिकाणचे रस्ते काँक्रीटीकरण, रुंदीकरण व नूतनीकरण - ४०० कोटी रुपयांहून अधिक निधी.
सार्वजनिक इमारती व सुविधा : प्रभाग कार्यालये, विद्यार्थी वसतिगृह, कर्करोग बंकर युनिट, प्रशिक्षण केंद्र, शाळा, मिनी मॉल व बहुउद्देशीय इमारतींची बांधणी - ५० कोटी रुपये. यासह इतर महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com