मुंबई
परिचारिका विनयभंग प्रकरणात गुन्हा
परिचारिका विनयभंग प्रकरणात गुन्हा
खालापूर (बातमीदार) ः आरोग्य केंद्रात रात्रपाळीसाठी कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेला अश्लील इशारे करणाऱ्यावर खालापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खालापूर आरोग्य प्राथमिक केंद्रात रात्रपाळीसाठी असलेल्या परिचारिकेला राम आलकुंठे (वय ४२, रा. साबाईनगर खालापूर) याने अश्लील हातवारे केले होते. याबाबत खालापूर पोलिस ठाणे येथे पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.