मुंबई
सोमैय्या नाल्याचे रुंदीकरण व सुरक्षा भिंतीच्या कामाचे भूमिपूजन
सोमय्या नाल्याचे रुंदीकरण व सुरक्षा भिंतीच्या कामाचे भूमिपूजन
घाटकोपर, ता. १९ (बातमीदार) ः विद्याविहार येथील नीलकंठ विहार परिसरात मुंबई महापालिकेमार्फत सोमया नाल्याच्या रुंदीकरण व सुरक्षा भिंत बांधकामाचे भूमिपूजन स्थानिक आमदार पराग शाह यांच्या हस्ते करण्यात आले. या कामामुळे नाल्याचे रुंदीकरण होऊन पावसाळ्यात परिसरात पाणी साचणार नाही, नागरिकांची सुरक्षितताही वाढणार आहे. भूमिपूजन कार्यक्रमावेळी पालिकेचे अधिकारी, माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.