संग्राम कानडे यांना उपसंचालक पदी पदोन्नती

संग्राम कानडे यांना उपसंचालक पदी पदोन्नती

Published on

संग्राम कानडे यांना उपसंचालकपदी पदोन्नती
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : नगरविकास विभागाने नगररचना व मूल्यनिर्धारण विभागातील सहाय्यक संचालक नगररचना या संवर्गातील आठ अधिकाऱ्यांना उपसंचालक नगररचना या पदावर पदोन्नती दिली आहे. यामध्ये सध्या ठाणे महापालिका येथे सहाय्यक संचालक नगररचना पदावर कार्यरत असलेले संग्राम कानडे यांचीही पदोन्नती झाली आहे.
संग्राम कानडे हे माजी आमदार लहू कानडे यांचे सुपूत्र असून, यापूर्वी त्यांनी पालघर, नाशिक येथे यशस्वीपणे काम केले आहे.
ठाणे पालिका येथे काम करताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन विविध उपक्रम राबवले, यामध्ये बुलेट ट्रेन स्टेशन एरिया प्लॅनिंग करिता सर्व घटकांना सामावून घेऊन नियोजन करण्याकरीता आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेमिनार आयोजित केला. तसेच ठाणे शहराची विकास योजनादेखील त्यांच्या कार्यकाळात सरकारकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आली आहे. याचबरोबर त्यांनी शहर विकास विभाग अधिक पारदर्शी काम करेल यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
मंत्रालयात अवर सचिव म्हणून काम करणारे प्रणव कर्वे यांनाही या आदेशानुसार उपसंचालक नगररचनापदी पदोन्नती दिली असून, त्यांना मंत्रालयातच उपसचिव नगरविकास विभाग या पदी पदस्थापना देण्यात आली आहे. तसेच, महेंद्र परदेशी यांना उपसंचालक नगररचना या पदी संचालक नगररचना या कार्यालयात पदस्थापना देण्यात आली आहे.

स्वराज्य अभियंता पुरस्काराने सन्मानित
पालघर येथे सहाय्यक संचालकपदी काम करताना त्यांनी वाडा, जव्हार, मोखाडा, तलासरी व विक्रमगड या शहरांचा विकास योजना आराखडा तयार केला होता. यासाठी त्यांना शासनाने सरकारने पहिला उत्कृष्ट सहाय्यक संचालक नगररचनेसाठी स्वराज्य अभियंता हिराजी इंदुलकर -२०२३ हा पुरस्कार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते देत सन्मानित करण्यात आले होते.

Marathi News Esakal
www.esakal.com