घरोघरी‘लक्ष्मी’अवतरली

घरोघरी‘लक्ष्मी’अवतरली

Published on

घरोघरी‘लक्ष्मी’अवतरली
सराफा, वाहन, बांधकाम क्षेत्रांत कोट्यवधींची उड्डाणे
पनवेल ता.२० (बातमीदार)ः दिवाळीचा उत्साह सर्वत्र जाणवत आहे. नवी मुंबई, पनवेल वसाहतींमधून बाजारपेठांत खरेदीसाठी तुफान गर्दीमुळे आनंदाचे वातावरण स्पष्ट जाणवत आहे. सोने-चांदी, वाहने बाजारात उलाढालीची कोट्यवधीची उड्डाणे झालेली आहेत.
दिवाळी लक्ष्मीच्या पावलांनी आली असल्यामुळे व्यापारीवर्गातही समाधानाचे वातावरण आहे. धनत्रयोदशीमुळे शनिवारी बाजारपेठा फुलल्यानंतर लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबिजेच्या खरेदीसाठीही रविवार सुट्टीचा दिवस असल्याने बरीच गर्दी जाणवली. धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर नवी मुंबई पनवेलमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या किमतीची सोने-चांदी खरेदी झाली. सोन्याचा भाव १० ग्रॅममागे एक लाख एकतीस हजार रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आले. तरीही ग्राहकांच्या खरेदीत घट झालेली नाही. शहरातील सराफा बाजारामध्ये दिवाळीत ग्राहकांची मोठी गर्दी होती. भाव वाढले तरी शुभमुहूर्त साधण्याची परंपरा कायम ग्राहकांनी ठेवली. हलके वजनाचे दागिने, सोन्याची नाणी आणि चांदीच्या वस्तूंना मोठी मागणी होती. यंदा ऑनलाइन खरेदीत मोठी वाढ झाली आहे.
----------------------------
बांधकाम क्षेत्राला उभारी
- बांधकाम क्षेत्रातही यंदा दिवाळीनिमित्त घर विक्रीत गेल्या वर्षाच्या तुलनेत चांगली वाढ आहे. विमानतळ परिसरासह शहराच्या मध्यभागासह उपनगरांतील प्रकल्पांमध्ये चांगले बुकिंग आहे. आकर्षक ऑफर्स, स्टॅम्पड्यूटी सवलत आणि फर्निचरचे पॅकेजमुळे ग्राहकांनी घरखरेदीचा उत्तम मुहूर्त साधता आला. विशेष म्हणजे, व्याजदर स्थिर असल्याने आणि सणाचा काळ लाभदायक असल्याने ग्राहकांनी निर्णय पुढे ढकलला नाही.
- सोने, बांधकाम क्षेत्रे शहराच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची आहेत. यंदा दोन्ही क्षेत्रातील वाढीमुळे केवळ व्यापारी नव्हे तर गुंतवणूकदार आणि ग्राहक वर्गातही आत्मविश्वास निर्माण झाला आहे. सोने-चांदी आणि बांधकाम क्षेत्रातील तेजीमुळे रोजगार, उत्पादन आणि गुंतवणुकीच्या संधींमध्ये मोठी वाढ होईल. या उत्साहाचा परिणाम वर्षाअखेरीस दिसेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
------------------------
वाहन नोंदणीत वाढ
दिवाळीनिमित्त शहरातील वाहन बाजारात जोरदार हालचाली झाल्या असून वाशी पनवेल परिवहनमध्ये हजारो वाहनांची नोंद झाली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वाहन उत्पादक आणि विक्रेत्यांनी विविध ऑफर्स जाहीर केल्या. सवलती, ईएमआय योजना, एक्स्चेंज बोनस आणि भेटवस्तू यांचा समावेश जीएसटी कपातीमुळे वाहनांची खरेदी सोपी झाली. वाहन बाजाराला नव्या उत्साहाने उभारी मिळाली. रंगीबेरंगी सजावट, चमकदार गाड्या आणि खरेदीसाठी उत्सुक ग्राहकांमुळे सणासुदीचा आनंद अधिक खुलून दिसत होता.
़़़़़़़़ः--------------------------------
दिवाळीचमध्ये माझ्या सदनिकेचे बुकिंग झाले. बिल्डरकडून स्टॅम्प ड्यूटी माफ, फर्निचरवर सवलत मिळाल्याने घराचे स्वप्न पूर्ण झाले.
- सतीश जरग, व्यावसायिक
----------------------------------
मी धनत्रयोदशीला सोन्याचे ब्रेसलेट घेतले. दिवाळी ऑफरमुळे बनवण्याचा खर्च कमी लागला. त्यावर सवलतही मिळाली. भाव जरी वाढले असले तरी सवलतींचा फायदा घेऊन परंपरा पूर्ण करता आली.
- विनोद जाधव, ग्राहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com