लक्ष्मीपूजनला प्रदूषणात वाढ

लक्ष्मीपूजनला प्रदूषणात वाढ

Published on

लक्ष्मीपूजनला प्रदूषणात वाढ
हवेतील प्रदूषण ११ तर ध्वनी ३.२ टक्क्यांनी वाढले
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ ः यंदाच्या दिवाळी सणात उत्साह ओसंडून वाहत असल्याने आणि फटाक्यांची आतषबाजी मोठ्या प्रमाणावर झाल्याने वातावरणातील प्रदूषण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाणे महापालिकेच्या अहवालानुसार, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणाच्या पातळीत सरासरी ११.१ टक्के वाढ झाली आहे. तसेच, ध्वनी प्रदूषणात ३.२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत प्रदूषण वाढले आहे. २०२४च्या तुलनेत यंदा हवेतील प्रदूषण ७.२ टक्क्यांनी अधिक असल्याचे दिसून आले आहे. मागील तीन वर्षांतील आकडेवारीनुसार २०२३ मध्ये दिवाळीदरम्यान हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ६२.६ टक्क्यांनी वाढला होता. २०२४ मध्ये ही वाढ ३३.९ टक्के होती. यंदा ही वाढ पुन्हा स्पष्टपणे जाणवली आहे.

पाऊस थांबताच धुळीचे कण वाढले
दिवाळीपूर्वी झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात प्रदूषणात घट झाली होती; मात्र पाऊस थांबताच हवेतील धुळीचे कण मोठ्या प्रमाणात वाढले, असे महापालिकेच्या निरीक्षणात आले आहे. ही स्थिती आरोग्यासाठी धोकादायक असल्याने, नागरिकांनी पर्यावरणपूरक फटाक्यांचा वापर करावा, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी केले आहे.

प्रदूषण नियंत्रण विभागाची आकडेवारी
घटक दिवाळीपूर्वी (११ ऑक्टोबर) लक्ष्मीपूजन (२१ ऑक्टोबर)
धुळीचे कण (कणकणीय पदार्थ) १४३ सूक्ष्म ग्रॅम प्रती घनमीटर १३९ सूक्ष्म ग्रॅम प्रती घनमीटर (सर्वाधिक)
नायट्रोजनचे संयुग ३१ सूक्ष्म ग्रॅम प्रती घनमीटर ३० सूक्ष्म ग्रॅम प्रती घनमीटर
गंधकाचे संयुग १३ सूक्ष्म ग्रॅम प्रती घनमीटर १७ सूक्ष्म ग्रॅम प्रती घनमीटर
हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक १४१ १५७

ध्वनी प्रदूषणाची स्थिती
दिवाळीच्या काळात ध्वनी प्रदूषणात ३.२ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. गतवर्षी ध्वनी पातळी ८६ एलमॅक्स इतकी होती, तर यंदा ती ८९.२ एलमॅक्स इतकी झाली आहे. फटाक्यांच्या अतिवापरामुळे हवेतील आणि ध्वनीतील प्रदूषण दोन्ही वाढले आहे. पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने ही चिंतेची बाब असून, यावर उपाय म्हणून हरित (पर्यावरणपूरक) फटाके आणि संयमी उत्सव साजरा करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com