माेदी-ट्रम्प भेट टळणार

माेदी-ट्रम्प भेट टळणार

Published on

‘आसियान’मध्ये माेदी-ट्रम्प भेट टळणार
पंतप्रधानांची ऑनलाइन उपस्थिती; जयशंकर यांची उपस्थिती

नवी दिल्ली, ता. २३ ः मलेशियात हाेणाऱ्या ‘आसियान’ शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली आहे. भरगच्च कार्यक्रमाच्या वेळापत्रकामुळे उपस्थिती शक्य नसल्याचे कारण देण्यात आले आहे. या परिषदेला पंतप्रधान माेदी ऑनलाइन उपस्थित राहणार असल्यामुळे माेदी आणि ट्रम्प यांची भेट टळणार आहे. यावरून माेदी यांच्यावर काॅँग्रेसने जाेरदार निशाणा साधला आहे.

असाेसिएशन ऑफ साउथ-ईस्ट नेशन्स (आसियान) ही प्रभावशाली संघटना असून भारतासह अमेरिका, चीन, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे या परिषदेच्या चर्चेत सहभागी हाेतात. काैलालंपूर येथे २६ ते २८ ऑक्टाेबरदरम्यान ही उच्चस्तरीय परिषद हाेणार आहे. २७ ऑक्टाेबरच्या चर्चेत माेदींऐवजी परराष्‍ट्रमंत्री एस. जयशंकर हे प्रतिनिधित्व करणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र माेदी हे आसियान-भारतादरम्यानच्या चर्चेचे नेतृत्व करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र माेदी आणि मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्यात बुधवारी चर्चा झाली. ‘माझे मित्र आणि मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्याशी चर्चा झाली. आसियानच्या यजमानपदासाठी त्यांचे अभिनंदन केले आणि या परिषदेच्या यशस्वितेसाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या. या शिखर परिषदेला ऑनलाइन उपस्थित राहणार आहे. यात दाेन्ही देशांदरम्यान व्‍यापक धाेरणात्मक भागीदारीवर भर देण्यात येणार आहे,’ असे माेदी यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.

पंतप्रधान माेदी यांच्याशी काल रात्री चर्चा झाली. या चर्चेदरम्यान द्वीपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी अधिक धाेरणात्मक आणि व्‍यापक स्तरावर काम करण्याबाबत सहमती झाली, असे मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी आपल्या समाजमाध्यमावरील पाेस्टमध्ये म्हटले आहे. व्‍यग्र वेळापत्रकामुळे माेदी यांनी काैलालंपूरला जाणे टाळल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मलेशियाचे पंतप्रधान इब्राहिम म्हणाले, की माेदी यांनी शिखर परिषदेला ऑनलाइन उपस्थित राहण्याची इच्छा व्‍यक्त केली आहे. त्यांनी सांगितले देशभरात दिवाळीचा सण सुरू आहे. त्यांच्या निर्णयाचा आदर आहे. दिवाळीच्या त्यांना आणि भारतीय नागरिकांना शुभेच्छाही दिल्या.
व्‍यापार आणि गुंतवणुकीबराेबरच तंत्रज्ञान, शिक्षण आणि प्रादेशिक सुरक्षेच्या क्षेत्रांमध्ये भारत हा मलेशियाचा महत्त्वाचा भागीदार राहिला असल्याचे त्यांनी स्पष्‍ट केले.
ईस्ट एशिया परिषद ही इंडाे-पॅसिफिक क्षेत्राती शांती, स्थैर्य आणि समृद्धीबाबत असलेल्या आव्‍हानांवर चर्चा करण्यासाठी माेठी संधी असते. तसेच प्रादेशिक आणि आंतरराष्‍ट्रीय घडामाेडींवरही या परिषदेत सखाेल चर्चा केली जाते, असे परराष्‍ट्र खात्याने म्हटले आहे.

आसियानमध्ये इंडाेनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, ब्रुनेई, व्‍हिएतनाम, लाओस, म्यानमार आणि कम्बाेडिया हे दहा सदस्य देश आहेत. गेल्या काही वर्षांत भारत आणि आसियान राष्‍ट्रांतील संबंधांना माेठी बळकटी मिळाली आहे. व्‍यापार, गुंतवणुकीबराेबरच सुरक्षा आणि संरक्षणावर अधिक भर देण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com