जनजातीय कौशल्य केंद्राच्या नवीन कार्यालयाची सुरुवात

जनजातीय कौशल्य केंद्राच्या नवीन कार्यालयाची सुरुवात

Published on

वाणगाव (बातमीदार) ः जनजातीय समाजातील युवकांसाठी जनजातीय कौशल्य केंद्र हे एक महत्त्वपूर्ण प्रशिक्षण केंद्र ठरेल. या समुदायाची नवीन पिढी आता फक्त कौशल्य शिकणार नाहीत तर आपल्या क्षेत्रात रोजगार सृजन केंद्र बनतील, असा सरकार आणि संस्थेचा उद्देश आहे, असे बालाजी इंडस्ट्रीचे मालक पिंकी खेमनानी यांनी सांगितले. दादरा नगर हवेली, दमण आणि पालघर जिल्ह्यातील जनजातीय युवकांना विविध व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येणार आहे. जनशिक्षण संस्थानद्वारा संचालित जनजातीय कौशल केंद्राच्या कार्यालयाची सुरुवात पारंपरिक उपक्रमांनी झाली. हे केंद्र मसाटस्थित १०३, शिवम हाइट, सिल्व्हासा, दादरा नगर हवेली येथे सुरू करण्यात आले. या कार्यालयात हस्तकला, शिलाई, भरतकाम, संगणक प्रशिक्षण, सायबर सुरक्षा, ब्युटीकेअर आदी प्रशिक्षण जनजातीय समाजातील तरुणांसाठी खुले करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून रोजगार आणि आत्मनिर्भरतेच्या संधी प्रदान केल्या जातील, असे प्रतिपादन जनशिक्षण संस्थानचे संचालक भारतकुमार गुंजाळ यांनी केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com